Kalyan Crime News esakal
मुंबई

Kalyan Crime News: आईच्या मृतदेहासोबत 'तो' एकटाच रहात होता; १४ वर्षीय मुलाचा धक्कादायक प्रकार

murder mystery: शेजाऱ्यांनी इमारतीत दुर्गंधी येत असल्याची तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली. इमारतीत दुर्गंधी येत असल्याने बुधवारी सोसायटीचा सुरक्षा रक्षक व शेजारी दुर्गंधीबाबत विचारणा करण्यासाठी फ्लॅटवर गेले.

सकाळ वृत्तसेवा

crime scene: कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १४ वर्षांचा मुलगा आईच्या मृतदेहासोबतच चार दिवस घरात एकटाच राहत होता. मृतदेह कुजल्यामुळे सोसायटीत दुर्गंधी येऊ लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी तपास केला असता ही बाब उघडकीस आली. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका निवासी संकुलातील एका ४४ वर्षीय महिलेचा तिच्या फ्लॅटमध्ये मृत्यू झाला, मात्र त्या वेळी कोणालाच याची माहिती मिळाली नाही.

शेजाऱ्यांनी इमारतीत दुर्गंधी येत असल्याची तक्रार केल्यावर ही बाब उघडकीस आली. इमारतीत दुर्गंधी येत असल्याने बुधवारी सोसायटीचा सुरक्षा रक्षक व शेजारी दुर्गंधीबाबत विचारणा करण्यासाठी फ्लॅटवर गेले.

घराचा दरवाजा ठोठावला असता मुलाने दरवाजा उघडला. तेथील स्थिती आणि महिलेचा मृतदेह पाहून लोकांना धक्का बसला. त्यांनी तत्काळ खडकपाडा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपास केला असता त्यांना फ्लॅटमध्ये मुलाच्या आईचा मृतदेह आढळला. मुलगा मानसिकरीत्या कमजोर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आजचे राशिभविष्य - 7 नोव्हेंबर 2024

Indian Railway: भारतीय रेल्वेने ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडलाही टाकले मागे, अनोख्या विक्रमाला गवसणी

Sakal Podcast: आता एका क्लिकवर १०८ रुग्णवाहिका पोहोचणार ते निवडणुकीत ‘धोतराची’ परंपरा खंडित

धक्कादायक! साडेपाच वर्षांत राज्यात १५ हजार ८२४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; अमरावती, छत्रपती संभाजी नगर विभागात सर्वाधिक प्रमाण; दररोज ७ शेतकरी करतात आत्महत्या

Mumbai: दारूसाठी वडिलांनी मागितले पैसे, रागाच्या भरात मुलानेच केली हत्या

SCROLL FOR NEXT