Dombivli MIDC Amudan Company Blast esakal
मुंबई

डोंबिवली MIDC स्फोटात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू; चार तास शोध मोहीम बंद, नातेवाईकांनी घातला गोंधळ

डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनी स्फोटात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत गुरुवारी स्फोट होऊन अनेक कामगार जखमी झाले असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसी अमुदान कंपनी स्फोटात (Dombivli MIDC Amudan Company Blast) आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सकाळी शोधकार्य सुरू असताना एक मृतदेह व काही मानवी अवशेष आढळून आले. दुपारी हे शोधकार्य थांबविण्यात आले होते. चार तास होऊन देखील बेपत्ता नागरिकांचा शोध घेतला जात नसल्याने नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला. अखेर नातेवाईकांचा दबाव येताच पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. यानंतर एक मृतदेह त्याठिकाणी आढळून आला.

डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत गुरुवारी स्फोट होऊन अनेक कामगार जखमी झाले असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून काही मानवी अवशेष (Human Remains) देखील जमा करण्यात आले आहेत. शनिवारी सकाळपासूनच बेपत्ता कामगारांचे नातेवाईक आणि बचाव पथकामध्ये बाचाबाची होत होती.

आमच्या माणसाचा शोध घ्या म्हणून नातेवाईक पथकास फोर्स करत होते. शनिवारी दुपारी एनडीआरएफ कडून (NDRF Team) शोधकार्य थांबविण्यात आले. नातेवाईक अग्निशमन दलास कामगारांचा शोध घ्या म्हणून सांगत होते. चार तास उलटले तरी बेपत्ता कामगारांचा शोध घेतला जात नसल्याने अखेर नातेवाईकांचा संयम सुटला. शोध सुरू करा आमचा माणूस आतमध्ये आहे. त्यातही नातेवाईकांना त्यांच्या बेपत्ता माणसाचे पॅन कार्ड व दुसऱ्या एका कामगाराची सायकल व हातातील घड्याळ मिळून आले.

Dombivli MIDC Amudan Company Blast Case

आपल्या माणसाचे साहित्य मिळाल्याने या दिशेला जेसीबी लावा म्हणून नातेवाईक दबाव आणू लागले. अखेर नातेवाईक यांनी प्रसिद्धी माध्यमांना कळविले. प्रसिद्धी माध्यम आल्यानंतर पोलीस प्रशासनाने जेसीबी चालकास शोध सुरू करण्याच्या सूचना केल्या. जेसीबी चालकाने शोध सुरू करताच काही क्षणात एक मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळून येताच नागरिकांनी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलास मृतदेह मिळाला ना? शोध कार्य का थांबवले होते? कोणी नाही आतमध्ये आता असे का सांगत होते? असे ओरडून सांगत होते. अखेर पोलिसांनी नातेवाईकांना शांत राहत सहकार्य करण्याचे आवाहन केले. बेपत्ता कामगारांचा शोध घेण्यात येईल, पण परिस्थिती पाहून थोडं सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजाराचा मूड बदलला; आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Latest Maharashtra News Updates : फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल?

Nagraj Manjule : खाशाबा जाधवांवरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नागराज मंजुळेंविरोधात समन्स

Mumbai: दारु पडली महागात; तीन तरुणांचा मृत्यू, वाचा नक्की काय घडलं?

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

SCROLL FOR NEXT