Dombivli MIDC Blast Case MNS leader Harshad Patil esakal
मुंबई

Dombivli MIDC Blast : 'त्या' अधिकाऱ्यांवर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, नाहीतर..; काय म्हणाले मनसे नेते पाटील?

डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनी स्फोट प्रकरणी (Dombivli MIDC Blast Case) कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा एका रात्रीत दाखल झाला आहे.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत (Chemical Company) गुरुवारी 23 मे रोजी भीषण स्फोट झाला. यात 9 जण मृत्युमुखी पडले आहे. तर, 64 जण जखमी आहेत.

डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनी स्फोट प्रकरणी (Dombivli MIDC Blast Case) कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा एका रात्रीत दाखल झाला आहे. परंतु, या कंपन्यांना सतत पाठबळ देणाऱ्या कामा संघटनेचे पदाधिकारी, एमआयडीसी आणि एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांवर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. नाहीतर या धोकादायक कंपन्या कधीच स्थलांतरीत होणार नाही, अशी मागणी मनसे शहर संघटक हर्षद पाटील (Harshad Patil) यांनी केली आहे.

डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत (Chemical Company) गुरुवारी 23 मे रोजी भीषण स्फोट झाला. यात 9 जण मृत्युमुखी पडले आहे. तर, 64 जण जखमी आहेत. जखमी रुग्णांना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, अमुदान कंपनी ब्लास्ट प्रकरणी कंपनी मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेनंतर मनसेचे शहर संघटक हर्षद पाटील यांनी ट्विटरवर पोस्ट करत सांगितले की, कालच्या डोंबिवलीतील महाभयंकर स्फोटानंतर प्रशासकीय यंत्रणा जागृत झाल्या आहेत. कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा एका रात्रीत दाखल झाला. परंतु, या कंपन्यांना सतत पाठबळ देणाऱ्या कामा संघटनेचे पदाधिकारी, एमआयडीसी आणि एमपीसीबी च्या अधिकाऱ्यांवरसुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. नाहीतर या धोकादायक कंपन्या कधीच स्थलांतरीत होणार नाही.

त्यामुळे कंपनी मालकाप्रमाणे अधिकाऱ्यांना दोषी ठरवून कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी मनसेचे शहर संघटक हर्षद पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ट्विटरवर पोस्ट करत केली आहे. दरम्यान, याप्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा दखल झाला आहे. तर बेजबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दखल होता का हे पाहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Electronic Voting Machine : EVM मशीनवर कशी मोजली जातात मते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra next CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? 'निकाला'नंतर तावडेंची बदलली भाषा, कोणाला दिलं विजयाचं क्रेडिट?

Kagal Assembly Election Results 2024 : मुश्रीफांनी समरजित घाटगेंचा केला टप्प्यात कार्यक्रम; कागलमध्ये लगावला 'विजयी षटकार'

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

SCROLL FOR NEXT