mumbai. 
मुंबई

डोंबिवलीकर शिक्षक खरे यांना मुंबई महापौर आदर्श शिक्षक पुरस्कार

संजीत वायंगणकर

डोंबिवली - आदर्श शिक्षक पुरस्कार मिळवणे म्हणजे त्या शिक्षकाने केलेल्या उत्कृष्ट कामाची पोचपावती आहे. त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांसाठी राबवलेले शैक्षणिक उपक्रम तसेच सामाजिक कार्य यांचे मुल्यांकन करूनच पुरस्कार दिला जातो, असे प्रतिपादन गृहनिर्माण व उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे काढले. 

यावेळी महापौर प्रि.विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, आमदार पराग अळवणी, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर, नगरसेवक सचिन पडवळ, श्रीकांत शेटये, नगरसेविका हर्षला मोरे, उपायुक्त मिलिंद सावंत शिक्षणाधिकारी महेश पालकर आदी उपस्थित होते. 

सावंत शिक्षणाधिकारी महेश पालकर आदी उपस्थित होते. डोंबिवलीकर रहिवासी विनायक खरे हे पवई मनपा इंग्रजी शाळा, कांजुरमार्ग येथे कार्यरत असून त्यांचा शैक्षणिक कार्याचा आलेख चढता आहे. खरे हे मूळचे मुरबाड (बेलपाडा) येथील छोट्याशा खेड्यातून असून त्यांच्या वर्गाचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकलेले आहेत.

खरे यांचे सामाजिक, सांस्कृतिक कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे, प्लॅस्टिकबंदी जनजागृती, कुष्ठरोग जनजागृती, व्यसनमुक्ती जनजागृती, गरीब व गरजूंना मदत, वृक्षारोपण असे विविध उपक्रम राबवलेले आहेत, सुंदर हस्ताक्षर, मनमिळाऊ स्वभाव, नेतृत्वगुण त्यामुळे ते विद्यार्थीप्रिय आहेत. त्यांना समाजात अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणूनच ओळखले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT