मुंबई

डोंबिवली- गणपती बाप्पाचे धुमधडाक्यात आगमन

संजीत वायंगणकर

डोंबिवली- विसर्जन मिरवणूकीने वाजत गाजत बाप्पाला निरोप द्यायची परंपरा, परंतू आता गणपती बाप्पाचे धुमधडाक्यात आगमन सोहळ्याच्या मिरवणूकीने स्वागत करण्याची नवीन चढाओढ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये सुरु झाली आहे.

गणेशोत्सवापूर्वीच्या आठवड्यात अशा मिरवणूकांच्या धामधूमीने शहरात उत्सवाचे वातावरण रंगत आहे. “बेटी बचाव” असा फक्त संदेश न देता ग्रामीण भागातील गरीब गरजू कुटुंबातील लेकींना प्रत्येकी 11000 रुपये देऊन कन्यादान करण्याचा वसा घेऊन समाजकार्य करणारे आजदे गाव ओंकार नगर, येथील सिध्दिविनायक मित्र मंडळ.. यंदा या मंडळाचा अकरावा गणेशोत्सव आहे. दशकपूर्तीच्या आनंदात आगळ्यावेगळ्या शाही थाटात आज या मंडळाच्या गणरायांचा आगमन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

निवासी विभागातून गणरायांची मिरवणूक ढोलताशांच्या गजरात व झगमगीत रोषणाईत आजदेगावाकडे निघाली. शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवाक राजेश मोरे , तात्यामाने, नगरसेविका प्रमिला पाटील, मंडळाचे अध्यक्ष निखील पाटील व सल्लागार बंडूशेठ पाटील या मान्यवरांच्या हस्ते गणरायांचे पूजन करुन आगमन सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. यंदा मंडळातर्फे गणेशोत्सव काळात नाविन्यपूर्ण छायाचित्रण व चलचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून शंभरावर नागरिकांनी यात भाग घेऊन उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. कल्याण डोंबिवली च्या महापौर विनीता राणे,आमदार सुभाष भोईर, नगरसेवक रमेश म्हात्रे या मान्यवरांनीही या आगमन सोहळ्यास उपस्थित राहून गणरायाला वंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT