मुंबई

म्युकर मायकोसिस आजार: एका औषधाबद्दल सूचना

'टास्क फोर्स'ने ही सूचना केली आहे.

मिलिंद तांबे - सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 'म्युकर मायकोसिस'मुळे (mukarmycosis disease) मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले असल्याची भीती व्यक्त होत आहे. या आजाराचे रुग्ण दररोज वाढत असून रुग्णाला स्टेरॉईडची मात्रा प्रमाणात देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती टास्क फोर्सचे सदस्य डॉ अविनाश सुपे यांनी दिली. कोरोना बाधित (corona patient) रुग्णांची संख्या वाढत असल्याने 'म्युकरमायकोसिस'चे रुग्ण देखील वाढत असल्याचे दिसते. (dont give heavy dose of Steroid to corona patient task force suggestion)

राज्यात दोन हजाराहून अधिक म्युकोरमायकोसिस रुग्ण आढळू शकतात असा अंदाज ही व्यक्त होतोय. यामुळे राज्यात होणाऱ्या मृत्यूंमध्ये 'ब्लॅक फंगस' मुळे होणारे मृत्यू देखील अधिक असून यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 50 टक्के असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोनव्हायरस रूग्णांमध्ये कमी झालेली प्रतिकारशक्ती किंवा इतर आजार असलेल्या रुग्णांना याचा जास्त धोका संभावतो असे राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले.

कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करतांना 'स्टेरॉईड'ची मात्रा अधिक दिल्याने देखील काही रुग्णांना या आजाराची लक्षणे दिसत असल्याचे ही डॉ सुपे म्हणाले. यामुळे रुग्णांवर उपचार करतांना 'स्टेरॉईड'ची अधिक मात्रा देऊ नये अशा सूचना टास्क फोर्स ने केल्याचे ही त्यांनी पुढे सांगितले.

राज्यात होत असलेल्या मृत्यूंपैकी 'म्युकरमायकोसिस' प्रमाण सांगणे कठीण आहे. यासाठी राज्यभरातील मृत्यूंचा अभ्यास करण्याच्या सूचना केल्या आहेत. यानंतर राज्यातील या आजाराची नेमकी स्थिती समजणार आहे असे ही डॉ सुपे यांनी सांगितले.मात्र सध्या राज्यभरात या आजाराचे रुग्ण वाढत असून मुंबई,पुण्यासारख्या शहरांमध्ये दररोज 8/10 रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याचे ही डॉ सुपे म्हणाले.

म्युकरमायकोसिस हा आजार झालेल्या रुग्णांमध्ये डोकेदुखी, ताप, डोळ्यांखाली वेदना, सायनस आणि दृष्टी कमी होणे आदी लक्षणं दिसून येतात.अशा रुग्णांच्या उपचारांसाठी म्फोटेरिसिन-बी हे आवश्यक असलेले एक औषध आहे. हाफकीन संस्थेला औषधाच्या एक लाख इंजेक्शन उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khanapur Assembly Election 2024 Results : सुहास बाबर यांना विक्रमी 27 हजाराचे मताधिक्य; तानाजीराव पाटील ठरले किंगमेकर!

Wani Assembly Election Results 2024 : वणी मतदारसंघात शिवसेनेची मशाल पेटली! संजय दरेकरांचा दणक्यात विजय

Raju Navghare Won Wasmat Assembly Election 2024 Result : दुरंगी लढतीत राजू नवघरे विजयी; जयप्रकाश दांडेगावकर यांचा पराभव

Aurangabad West Assembly Election 2024 Result Live: शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत संजय शिरसाटांनी राखला गड

Mahesh Choughule Won in Bhiwandi West Assembly Election : भिवंडी पश्चिम मतदार संघावर तिसऱ्यांदा भाजपचा झेंडा; महेश चौघुलेंची बाजी

SCROLL FOR NEXT