मुंबई : कोरोनावर अद्याप लस सापडली नसली तरी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढे आणि औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. समाज माध्यमावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ आणि माहितीच्या आधारे असे काही काढे नागरिकांकडून सर्रास बनवण्यात येत आहेत. परंतु, हे काढे आणि आयुर्वेदिक औषधे दिशाभूल करणारी आणि बनावट असल्याचा दावा महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनकडून (एमसीआयएम) करण्यात आला आहे. त्यामुळे कोणताही काढा किंवा आयुर्वेद, युनानी औषध तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये, असे आवाहन ICMR कडून नागरिकांना करण्यात आले आहे.
कोरोना पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नागरिक आयुर्वेद आणि युनानी चिकित्सा पद्धतीमधील काढे आणि औषधाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देत आहेत. आयुष मंत्रालयाद्वारे सुचवण्यात आलेला आयुष काढा आणि अन्य औषधांनाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक घरातच असल्याने घरच्या घरी सहज बनवता येणार्या अनेक काढ्यांची माहिती सध्या समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत.
दुष्परिणाम होण्याची शक्यता
समाज माध्यमावर गैरनोंदणीकृत व्यक्तींकडूनही कोरोनापासून रक्षणासाठी आयुर्वेद, युनानी औषधे सुचविली जात आहे. नागरिकही अशाप्रकारचे काढे व औषधे तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेत आहेत. मात्र, त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोंदणीकृत आयुर्वेद व युनानी डॉक्टरांकडूनच काढे आणि औषधे घ्यावी. तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही औषध घेऊ नये. - डाॅ. आशुतोष गुप्ता, एमसीआयएम, अध्यक्ष.
( संपादन - सुमित बागुल )
dont make immunity kadha before consulting ayurvedic or unani doctors
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.