मुंबई

मेघगर्जनेसह वीज कडाडत असल्यास काय कराल, काय टाळाल ? कायम कामी येणारी माहिती

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 23 : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कारण आज आणि उद्या महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्राच्या उत्तर, दक्षिण, मध्य आणि मराठवाडा या भागात तुरळक मेघगर्जनेसह तसेच विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. याशिवाय राज्यातील काही भागांमध्ये गरपिटीचाही इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात 30-40 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उद्या म्हणजेच 24 मार्च रोजी देखील उत्तर, दक्षिण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर पुढील 2 दिवस हवामान कोरडे राहील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

शेतात असताना जर मेघगर्जना होत असेल तर काय करावे,  काय करू नये

काय करावे : 

  • मेघगर्जनेच्या पार्श्वभूमीवर फळबागांना आणि भाजीपाल्याला आधार दिल्यास नुकसान कमी प्रमाणात होऊ शकते. 
  • शेतकरी शेतात असतील आणि त्यांना कोणताही निवारा मिळत नसेल तर सदर  परीसरातील सर्वात ठिकाणी जाणं टाळायला हवं.
  • परिसरात तुरळक झाडे असल्यास सर्वात उत्तम संरक्षण म्हणजे खुल्या मैदानात किंवा उघड्यावर दबा धरून बसावे (आपले पाय पोटाशी व हात कानावर आणि डोळे झाकावे, म्हणजे शरीराचा आकार कमी करणे).
  • प्राण्यांना खुले पाणी, तलाव किंवा नदीपासून दूर ठेवा.
  • प्राण्यांना ट्रॅक्टर आणि इतर धातूच्या शेती उपकरणांपासून दूर ठेवा.
  • शेतातील उभ्या पीकांमधून नको असलेलं पाणी काढून टाका.
  • जर शेतातील पीक / उत्पादन (शेतात असल्यास) पॉलिथीन शीटने झाकून ठेवा.

हे करू नका

  • विद्युत उपकरणे किंवा वायर / केबलचा संपर्क टाळा.
  • कोणत्याही धातू - ट्रॅक्टर, शेतीची उपकरणे आणि दुचाकींपासून स्वतःचा आणि पाण्याचा संपर्क दूर ठेवा.
  • धातू किंवा इतर पृष्ठभाग हे विद्युत वाहक असतात. 
  • आपल्या प्राण्यांना झाडाखाली जमू देऊ नका. प्राण्यांकडे लक्ष ठेवा आणि त्यांना आपल्या थेट नियंत्रणाखाली ठेवण्याचा प्रयत्न करा. 
     

खलील महत्त्वाच्या गोष्टीही पाळा 

  1. बाहेरील नियोजीत कार्यक्रम किंवा अन्य कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यापूर्वी हवामानाचा अंदाज तपासून पाहावा. जर हवामानाच्या अंदाजात वादळी पावासाची शक्यता वर्तवली असेल तर बाहेरील कार्यक्रम किंवा रद्द केलेले किंवा पुढे ढकललेले बरे. 
  2. मेघगर्जना किंवा वीजा चमकत असल्यास घराच्या आत किंवा सुरक्षित आश्रयाल जावे. धातुंची रचना असलेले किंवा धातु पासून बांधकाम केलेले ठिकाण सोडावे. सुरक्षित निवारा म्हणजे पक्के घर, पक्की इमारत 
  3. जर आपल्याकडे विद्युतरोधक फोम पेंड किंवा कोरडया, कपड्यांची धातु विहरित -फ्री बॅग असेल तर ती आपल्या खाली ठेवा.
  4. वादळावेळी आपण एखाद्या गटात असाल तर एकमेकांपासून विभक्त व्हा. जर दुर्दैवाने विज कोसळली किंवा दुरदैवी घटना घडली तर जखमींची संख्या कमी होईल.
  5. अद्ययावत माहिती किंवा सूचनांसाठी स्थानिक रेडिओ आणि दूरदर्शन स्टेशन ऐकणे सुरु ठेवा, 
  6. ज्या नागरिकांना विशेष मदतीची आवश्यकता असेल त्यांना स्वतःची काळजी घेऊन मदत करा. यामध्ये मुलं आणि वृद्धांचा समावेश होतो. 
  7. विजेची तार खाली पडली असेल तर त्या पासून दूर रहा आणि त्वरित त्याचा अहवाल किंवा तक्रार संबंधितांना द्या.
  8. 30/30 वीजेच्या सुरक्षिते चा नियम लक्षात ठेवा म्हणजे वीज कडाडल्यानंतर गर्जना ऐकण्यापूर्वी तुम्ही 30 मोजण्याच्या आत सुरक्षित ठिकाणी जा. मेघगर्जनेचा शेवटचा आवाज ऐकल्यानंतर 30 मिनिटांसाठी घरात रहा.
  9. जर तुम्ही मेघगर्जनेत सापडले असाल आणि जवळपास सुरक्षित आसरा नसेल तर ताबडतोब डोंगर, डोंगर रस्ता किंवा शिखरे अशा उंच भागातुन बाहेर जा. निवाऱ्यासाठी कधीही डोक्यावर असलेल्या उंच कडा किंवा खडकाळ जागेचा वापर करु नका.
  10. पाण्याने भरलेले डबके, तलाव आणि इतर पाण्यांच्या ठिकाणापासून दूर राहा. जर आपण मैदानी पाण्यासारख्या क्षेत्रात (उदा. धान प्रत्यारोपण) काम करत असल्यास, ताबडतोब शेताच्या बाहेर कोरड्या क्षेत्रात (किमान शेताच्या सीमेवर) जा.
  11. सखल भागात एक निवारा शोधा आणि निवडलेल्या जागेला पूर येण्याची शक्यता नाही हे सुनिश्चित करा.
  12. जमिनीवर सपाट झोपू नका कारण यामुळे आपले शरीर जास्त जागा व्यापु शकते
  13. जर कोठेही निवारा उपलब्ध नसेल तर ताबडतोब विजेच्या काऊचमध्ये जा: (म्हणजे पाय पोटाशी दुमडून बसणे (एकत्रित स्पर्श करून) किंवा घट्ट बॉलमध्ये बसा, हात पाय गुंडाळून बसा, डोके खाली केलेले. कान झाकलेले आणि डोळे बंद करा). यामुळे आपणास विळखा पडतो आणि आपल्या शरीराचा आकार लहान होतो. 
  14. आपल्या गळ्याच्या मागील बाजूस उभे झालेले केस हे सूचित करतात की वीज जवळ आहे 
  15. वीजेवर चालणारी सर्व उपकरणे व वस्तु म्हणजेच फोन, पॉवर, धातुचे कुंपण, पवनचक्की इत्यादींपासून दूर राहवे.
  16. रबरी तळवे असलेले शूज आणि कारचे टायर विजेपासून संरक्षण देत नाहीत.
  17. घराबाहेरील हलक्या वस्तू संरक्षित करा, कारण सोसाटयाच्या वाऱ्याने त्या उडून मोठं नुकसान होऊ शकतं. 

dos and donts while lightning thunders and hail storm read full guides beneficial for farmers

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT