Dr. Hemant Savara Victory in the Lok Sabha Election esakal
मुंबई

Palghar Lok Sabha : डाॅ. सावरांच्या विजयाने पालघरमध्ये भाजपची वाढली ताकद; आता विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु

राज्यात फोडाफोडीचं राजकारण, घटना बदलाचा प्रचार, कांदा, सोयाबीन आणि कपाशीच्या दराचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला.

भगवान खैरनार

पालघरमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे.

मोखाडा : राज्यात फोडाफोडीचं राजकारण, घटना बदलाचा प्रचार, कांदा, सोयाबीन आणि कपाशीच्या दराचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत गाजला. त्याचा मोठा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला. मात्र, पालघर लोकसभा त्याला अपवाद ठरली आहे. येथून महायुतीचे डाॅ. हेमंत सावरा (Dr. Hemant Savara) हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. पालघर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसताना सहा विधानसभा पैकी डहाणू विधानसभा क्षेत्रात तुरळक मतांची पिछाडी वगळता, भाजपनं पाच विधानसभा क्षेत्रात मोठे मताधिक्य मिळविले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पालघर (Palghar Lok Sabha) जिल्ह्यात भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी अंदाज, आडाखे बांधत बैठका घेणे सुरू केले आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यासाठी घटना बदल, कांदा, सोयाबीन आणि कपाशीच्या दराचा मुद्दा गाजला आहे.

या निवडणुकीत बसलेल्या फटक्याची दुरूस्ती करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपआपल्या पध्दतीने रणनीती आखत, मोर्चेबांधणी करण्याची तयारी करू लागले आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक मोठा धक्का बसला आहे. मात्र, पालघर लोकसभा निवडणुकीत या उलट चित्र समोर आले आहे. पालघर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नसताना भाजपचे उमेदवार डाॅ हेमंत सावरा यांनी सुमारे 1 लाख 83 हजार मतांचे मताधिक्य घेऊन विजय संपादन केला आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या सभा झाल्या.

जिल्ह्याचे पालकमंत्री भाजप नेते रविंद्र चव्हाण हे जिल्ह्यात ठाण मांडून बसलेले होते. महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत करून, ही विजयश्री मिळवली आणि पुन्हा पालघर लोकसभेची जागा आपल्याकडे खेचून आणली आहे. या निवडणुकीत सहा विधानसभांपैकी डहाणू विधानसभा क्षेत्रात डाॅ हेमंत सावर यांना नाममात्र 882 मतांची पिछाडी मिळाली आहे. तर विक्रमगड, पालघर, बोईसर, वसई आणि नालासोपारा या पांच विधानसभा क्षेत्रात भाजपने अपेक्षेपेक्षा मोठे मताधिक्य मिळवले आहे. विक्रमगड विधानसभा क्षेत्रात 33  हजार  209, पालघर - 29 हजार 239,  बोईसर -  41  हजार 733, नालासोपारा  -  70  हजार  668  आणि वसई- 9  हजार  419  या विधानसभा क्षेत्रात डाॅ सावरा यांनी भरघोस मताधिक्य मिळवले आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा पालघर जिल्ह्यात दमदार कमबॅक केले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालावरुन आगामी विधानसभा निवडणुकीचे खलबते सुरू झाली आहेत. विधानसभा क्षेत्र निहाय मतांची गोळाबेरीज केली जात आहे. पालघर लोकसभा क्षेत्रातील विधानसभा निहाय भाजपला मिळालेल्या मताधिक्याने विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारांना धोक्याची घंटा मिळाली आहे. विक्रमगड विधानसभेसाठी नवनिर्वाचित खासदार डाॅ सावरा यांनी गेली चार वर्षापासून मोर्चेबांधणी केली आहे. त्याचा मोठा फायदा भाजपला होणार आहे.

डहाणूत आमदार निकोळेंनाही चपराक बसली आहे. तर, बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या बोईसर, नालासोपारा आणि वसई या विधानसभा क्षेत्रातील विद्यमान आमदार राजेश पाटील, क्षितीज ठाकुर आणि हितेंद्र ठाकुर यांचीही डोकेदुखी वाढली आहे. त्यांनाही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. सर्वच विद्यमान आमदारांना आगामी विधानसभेची निवडणूक सोपी नसणार, हे लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीने सुचित केले आहे.

पालघरमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे भाजप विक्रमगड, डहाणूसह जिल्ह्यातील अन्य विधानसभेच्या जागांवर दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, महायुतीमध्ये जागांचा फार्म्युला कसा ठरतो यावर सगळे गणिते अवलंबून आहेत. परंतु, या जागांवर आगामी निवडणूक लढण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT