Dr. Saket Hemant Patil receives the Dr. Maithili Sharan Signature International Award Sakal
मुंबई

Mumbai News: वसईतील 'डॉ. साकेत हेमंत पाटील' आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Mumbai News: डॉ. मैथिली शरण सिग्नेचर आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा वसईतील नामवंत स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. साकेत हेमंत पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

विरार : डॉ. मैथिली शरण सिग्नेचर आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा वसईतील नामवंत स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. साकेत हेमंत पाटील यांना नुकताच प्रदान करण्यात आला. गोवा येथील एका कार्यक्रमात डॉ. साकेत हेमंत पाटील यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

एखाद्या व्यक्तीचे समाजाप्रती असलेले कार्य जागतिक व्यासपीठावर आणून त्या व्यक्तीचा तसेच त्याच्या कार्याचा सन्मान करणे या उद्देशाने सुवाच आणि साऊथ एशियन फेडरेशन ऑफ ओबीसीटेरिकस आणि गायनॅकोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. या वर्षी डॉ. साकेत हेमंत पाटील यांना त्यांनी केलेल्या तसेच त्यांच्या अगोदरच्या पिढीने केलेल्या ग्रामीण भागातील उल्लेखनीय वैद्यकीय सेवेबद्दल हा सन्मान देऊन गौरवण्यात आले.

डॉ. साकेत हेमंत पाटील हे त्यांचे वडील ‘कोविडयोद्धा’ स्व. डॉ. हेमंत दामोदर पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची समाजाभिमुख असलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ डॉ. साकेत पाटील यांनी वसईतील पारनाका येथे नायशा प्रसूतीगृह सुरू केले. डॉ. साकेत हेमंत पाटील हे अत्यंत वाजवी किमतीत गर्भवती स्त्रियांना वैद्यकीय सेवा त्यांच्या प्रसूतीगृहात प्रदान करतात. स्त्रियांच्या इतर आजारांच्या उपचाराबरोबरच तेथे गर्भसंस्कारविषयक माहिती देणे, गर्भाशय आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करणे या समाजाभिमुख जनजागृतीच्या उद्देशाने दर महिन्याला विनामूल्य शिबिराचे आयोजन केले जाते.

या शिबिराचा अनेक महिला फायदा घेत आहेत. डॉ. साकेत पाटील हे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात स्त्री-रोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सरकारी रुग्णालयात गरोदर स्त्रियांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी ते तेथील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देत असतात. ‘‘माझे दिवंगत वडील डॉ. हेमंत दामोदर पाटील यांचे तसेच माझी आई डॉ. शुभांगी पाटील यांचे वैद्यकीय आणि सामाजिक कार्य पुढे नेण्यास हा पुरस्कार मला नेहमीच प्रोत्साहित करेल,’’ असा विश्वास डॉ. साकेत पाटील यांनी पुरस्कार स्वीकारताना व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT