Shrikant Shinde  sakal
मुंबई

Shrikant Shinde : विकासकामांना मतदानाच्या टक्केवारीत वाढवण्याचे रूपांतर करा ; डॉ.श्रीकांत शिंदें

ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची आहे.त्याअनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या सर्व घटकपक्षांनी मिळून जोमाने कामाला लागा अशी हाक देतानाच गेल्या 10 वर्षात असंख्य विकासकामे झाली असून बरीच कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : ही निवडणूक एका व्यक्तीची नसून देशाची आहे.त्याअनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या सर्व घटकपक्षांनी मिळून जोमाने कामाला लागा अशी हाक देतानाच गेल्या 10 वर्षात असंख्य विकासकामे झाली असून बरीच कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.त्यामुळेच महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून या विकासकामांना मतदानाच्या टक्केवारीत वाढवण्याचे रूपांतर करा असे आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरात केले.अभूतपूर्व गर्दी झालेल्या महायुतीच्या संवाद मेळाव्यात डॉ.शिंदे बोलत होते.

भुयारी गटार योजना,सिमेंट काँक्रिटचे रस्ते,कॅशलेस हॉस्पिटल,कामगार हॉस्पिटल अशा अनेक सुविधा आत्तापर्यंत पुरवल्या आहेत.अनधिकृत इमारतींचे नियमितीकरण आणि पुनर्विकास यासाठी नियम बदलून राज्य सरकारने आणलेले धोरण हा सर्वात महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने उल्हासनगरसाठी घेतला आहे, असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले.त्यामुळे पुढील 20 दिवस आपण सर्वांनी मिळून प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचे असून पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून आपण केलेली कामे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवायची आहेत,नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान होणे गरजेचे असल्याचे डॉ.श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,आमदार कुमार आयलानी, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव,माजी खासदार आनंद परांजपे,साई पार्टीचे अध्यक्ष जीवन इदनानी,माजी आमदार जगन्नाथ(आप्पा)शिंदे,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सोनिया धामी,जिल्हाध्यक्ष भारत गंगोत्री,भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी,रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव,शिवसेना प्रवक्ते किरण सोनावणे,उपजिल्हाप्रमुख अरुण आशान,दिलीप गायकवाड,महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी,शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर,रमेश चव्हाण, शिवसेना महिला जिल्हा संघटक छायाताई वाघमारे,शहर संघटक मनीषा भानुशाली,माजी महापौर राजश्री चौधरी,लिलाबाई आशान,मीना आयलानी यांच्यासह महायुतीतील सर्व घटकपक्षांचे पदाधिकारी,माजी नगरसेवक,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT