Ambedkar Jayanti Mumbai sakal
मुंबई

Ambedkar Jayanti:प्राचार्य असताना डॉ. आंबेडकर विद्यार्थ्यांशी घटना आणि कायद्यावर थेट चर्चा करायचे

या विधी महाविद्यालयाचे ते १९३६ ते १९३८ या काळात प्राचार्य होते. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. ते शिकविताना समोर बसलेले विद्यार्थी हे देशाचे भावी वकील आहेत, उत्तम राजकीय नेते, समाज घडविणारे कार्यकर्ते आहेत असे समजून त्यांच्याशी संवाद साधत.

विष्णू सोनवणे

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शासकीय विधी महाविद्यालयात १९३५ मध्ये प्रोफेसर होते आणि याच महाविद्यालयाचे ते १९३६ ते१९३८ या काळात प्राचार्य होते. कायदा आणि राज्य घटना या विषयावर ते थेट विद्यार्थ्यांसोबत चर्चा करीत असत. त्यांच्या ज्ञानाने विद्यार्थी प्रभावित होत. शिक्षणानेच देशाची प्रगती होईल याच्यावर त्यांचा ठाम विश्वास होता.

म्हणूनच देशाची जडणघडण करण्यासाठी ते विद्यार्थी घडवित होते. ते एक दृष्टा शिक्षक होते. त्या ज्ञानसूर्याच्या तेजाने विद्यार्थीही तळपत होते,

अशी माहिती शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अस्मिता वैद्य यांनी दै. सकाळशी बोलताना दिली.

डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय विधी महाविद्यालयातील त्यांच्या प्राचार्य पदाच्या कार्यकिर्दीतील आठवणी प्राचार्या डॉ. वैद्य यांच्याकडून जाणून घेतल्या. त्या म्हणाल्या, याच महाविद्यालयातून त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि याच महाविद्यालयात ते १९३५ मध्ये प्रोफेसर होते.

या विधी महाविद्यालयाचे ते १९३६ ते १९३८ या काळात प्राचार्य होते. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. ते शिकविताना समोर बसलेले विद्यार्थी हे देशाचे भावी वकील आहेत, उत्तम राजकीय नेते, समाज घडविणारे कार्यकर्ते आहेत असे समजून त्यांच्याशी संवाद साधत.

राज्यघटना आणि कायदा यावर ते विद्यार्थ्यांशी थेट चर्चा करीत असत. ही चर्चा म्हणजे विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा खजिनाच असे. डॉ. बाबासाहेब हे आमच्या महाविद्यालयात होते हे आमचे भाग्य असल्याची भावना प्राचार्य डॉ. वैद्य यांनी व्यक्त केली.

डॉ. बाबासाहेबांची शिक्षणाविषय़ी तळमळ पदोपदी जाणवते, असे स्पष्ट करून प्राचार्या डॉ. वैद्य म्हणाल्या की, शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी हा भावनिक, बौद्धिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विकसित झाला पाहिजे.

विद्यार्थांनी चिंतन मनन केले पाहिजे असा त्यांचा अट्टाहास होता. विद्यार्थी म्हणजे देशाची धुरा सांभाळणारे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य आणि जबाबदारी अतिशय जोखमीने पार पाडली पाहिजे. विद्यार्थांवर या समाजाचे भवितव्य अवलंबून असते, असे त्यांचे मत होते.

त्यामुळे, विद्याथ्यांनी आपल्या बुद्धीला चालना देऊन बौद्धिक शक्तीचे संवर्धन केले पाहिजे. विद्याथ्र्यांनी ज्ञानार्जनात खंड पडू देता कामा नये, असे डॉ. बाबासाहेबांचे मत अशी माहिती डॉ. वैद्य यांनी दिली.

विद्यार्थ्यांसाठी ग्रंथांचा खजिना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राज्य घटनेच्या मसूदा समितीचे अध्यक्ष होते. प्राचार्य असताना घटनेच्या मसूद्याची प्रत त्यांनी या महाविद्यालयाचे व्यवस्थापक आय एस. हाजी यांना ४ मार्च १९४८ रोजी स्वत:च्या सहीने दिली. ती प्रत विधी महाविद्यालयाच्या ग्रंधालयात जतन केली आहे.

१८५५ मध्ये या विधी महाविद्यालयात बाबासाहेबांनी पहिल्यांदा "राज्यघटना" हा विषय सुरू केला. १९४७ साली चर्चगेट येथे विधी महाविद्यालय सुरू झाले. त्यापूर्वी ते एल्फिन्सटन महाविद्यालयात सुरू होते. शासकीय विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेबांनी ग्रंथाचा खजिना उपलब्ध केल्याची माहिती या महाविद्यालयाचे ग्रंथपाल सुभाष धुळे यांनी दिली.

वर्ग तुडुंब व्हायचा

सिडनहॅम महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रोफेसर होते. इकॉनॉमिक्स, पॉलिटीक्स हा विषय शिकवत असत. त्यांच्या लेक्चरसाठी विद्यार्थ्यांची गर्दी व्हायची. इतर महाविद्यालयांचे विद्यार्थीही त्यांच्या लेक्चरसाठी येत असत.

त्यामुळे त्यांचा वर्ग तुडूंब भरत असे. १९५५ रोजी चर्चगेट येथील सिडनहॅम महाविद्यालयाची इमारत बांधली त्यापूर्वी हे महाविद्यालय जहॉंगीर आर्ट गॅलरीच्या इमारतीत सुरू होते.

या महाविद्यालयातही ते प्राचार्य होणार होते. मात्र अस्पृश्य असल्याने त्यांना प्राचार्यपद नाकारण्यात आल्याची माहिती सिडनहॅम महाविद्यालयाचे ग्रंथपाल उन्मेष नांगरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT