मुंबई

धक्कादायक! विद्यार्थ्यांसाठी पिण्याचे पाणी शौचालयातून! 

तेजस वाघमारे

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील "युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ ऍकॅडमी'मध्ये (उमला) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चक्क शौचालयात केली आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी केल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीच दखल घेण्यात येत नसल्याने पाणी पिण्यासाठी विद्यार्थ्यांना इतर विभागांमध्ये वणवण करावी लागत आहे. 

विधी अभ्यासक्रमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मुंबई विद्यापीठाने पाच वर्षांपूर्वी "युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई लॉ ऍकॅडमी'ची स्थापना केली; मात्र अनेक त्रुटींमुळे हा विभाग कायम चर्चेत राहिला आहे. 
स्थापनेपासून आजतागायत "उमला'ला पूर्णवेळ संचालक नसणे, प्राध्यापक-विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच नसणे, पायाभूत सुविधांची कमरता अशा अनेक समस्या विभागात आहेत. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून 50 हजारांपर्यंत शुल्क घेतल्यानंतरही त्यांना आवश्‍यक सुविधाही देण्यात विद्यापीठ अपयशी ठरले आहे. विद्यार्थ्यांनी किमान सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी अधिकाऱ्यांकडे केली होती; मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. 

विकास म्हणजे कॉंक्रीटीकरण नव्हे - उद्धव ठाकरे

"उमला'चे वर्ग असलेल्या दुसऱ्या मजल्यावर विद्यार्थिनींसाठी पिण्याच्या पाण्याचा कुलर चक्क शौचालयात बसवला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाला कूलर शौचालयाबाहेर लावून देण्याबाबत तक्रार केली आहे. तसेच या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मुलांच्या शौचालयातही पिण्याच्या पाण्याचा कूलर ठेवला आहे. तसेच त्याला फिल्टर नसल्याने विद्यार्थ्यांना इतर विभागांतून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्याऐवजी विद्यार्थ्यांना येथील समस्यांनाच सामोरे जावे लागत असल्याचे विभागातील एका विद्यार्थ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

यूजीसी, बार काऊन्सिलचे नियम धाब्यावर 
"उमला' विभागाने विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि बार काऊन्सिलच्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे, परंतु विद्यापीठाकडून पूर्णवेळ संचालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि पायाभूत सुविधांची पूर्तता होणे आवश्‍यक आहे, परंतु हे नियम धाब्यावर बसवत विद्यापीठाकडून कारभार सुरू आहे. 

बेंचऐवजी प्लास्टिक खुर्च्या 
विभागाने विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचऐवजी प्लास्टिक खुर्च्यांची व्यवस्था केल्याने अभ्यास करताना गैरसोय होत आहे. तसेच ग्रंथालयात आवश्‍यक पुस्तके आणि ग्रंथपाल नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 
 

"उमला'मधील दुरवस्थेची माहिती घेण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल. 
- डॉ. अजय देशमुख, कुलसचिव, मुंबई विद्यापीठ. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सहलीसाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, आई-वडिलांसह मुलगा-मुलगी अपघातात जागीच ठार; गाय आडवी आली अन्..

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध थांबवू... डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही; मृतांबद्दल दुःख व्यक्त

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंची ‘काम करणारा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा झाली यशस्वी

Baba siddiqui Murder case: बिश्नोईच्या हिट लिस्टवर कॉमेडिन मुन्नवर फारुकी अन् श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब पूनावाला; सुरक्षेत वाढ

SCROLL FOR NEXT