Drivers are facing significant difficulties due to the bridge's poor state  sakal
मुंबई

Dombivli News : 'शहाड' उड्डाणपुल होणार चारपदरी; एमएमआरडीएकडून निविदा जाहीर

शर्मिला वाळुंज

डोंबिवली: शहाड रेल्वे उड्डाणपुलाची दुरावस्था झाल्याने वाहन चालक हैराण झाले आहेत. नागरिकांना आता दिलासा मिळणार असुन या रेल्वे उड्डाणपुलाचे लवकरच विस्तारीकरणाचे काम सुरू होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून या कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे.

सध्या दोन पदरी असलेला हा उड्डाणपूल चार पदरी होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवास वेगवान होण्यास मदत होईल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात रस्ते वाहतूक सुरळीत व्हावी यादृष्टीकोनातून विविध प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मेट्रो, रस्ते, पूल, उड्डाणपूल, रस्ते रूंदीकरण, रेल्वे मार्गांचे विस्तारीकरण अशा अनेक प्रकल्पांमधून नागरिकांची वाहतूक गतीमान होणार आहे. कल्याण - उल्हासनगरसह अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून अहिल्यानगर आणि परिसराला जोडणारा शहाड रेल्वे उड्डाणपूल महत्वाचा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या विकास आराखड्यानुसार शहाड स्टेशन येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कल्याण बाजूच्या रस्त्याची रुंदी 30 मीटर असून उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील 36 मीटर आहे.

या उड्डाणपुलावरची वाहतूक गेल्या काही वर्षात वाढली आहे. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूला चार पदरी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र उड्डाणपूल फक्त दुपदरी असल्याने अनेकदा उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेशद्वारावर कोंडी होत असते. कधी वाहन उड्डाणपुलावर बंद पडल्यास अथवा उड्डाणपुलाची दुरूस्ती हाती घेतल्यास एकाच मार्गिकेवरून वाहतूक होते. परिणामी दोन्ही बाजूने कोंडी होत असते. त्यामुळे या उड्डाणपुलाचे विस्तारीकरण करण्याची मागणी स्थानिकांची होती.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एमएमआरडीए प्रशासनाकडे या उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाची आग्रही मागणी केली होती. या कामासाठी निधीही मंजूर करून देण्यात आला होता. कामकाजाची आवश्यक पूर्तता झाल्यानंतर आता एमएमआरडीएने या कामासाठी निविदा जाहीर केली आहे. वाहनांची गर्दी आणि वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या अपघात टाळण्यासाठी शहाड स्टेशन येथील रेल्वेउड्डाणपूल चार पदरी विकसित करणे गरजेचे आहे.

मुंबई महानगर विकास प्राधिकरण ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी व दळणवळण व्यवस्था मजबूत करण्यासाठी विस्तारित मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प अंतर्गत शहाड येथील रेल्वे उड्डाणपूलाचे चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे. या रेल्वे उड्डाणपुलाची एकूण लांबी 1090 मीटर इतकी आहे. निविदा जाहीर झाल्याने लवकरच या उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे शहाड पुलावरची कोंडी लवकरच फुटणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजी छत्रपतींचा ताफा मुंबईत अडवला, गाडीवर चढून भाषण! म्हणाले, "पटेलांचा पुतळा झाला पण..."

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Dussehra Fashoin Tips: यंदा महानवमी अन् दसऱ्याला 'या' पद्धतीने करा तयारी, सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

SCROLL FOR NEXT