drug smuggler lalit patil arrested by mumbai police from chennai pune sassoon hospital drug racket  Esakal
मुंबई

Lalit Patil Drugs Case: "मी पळालो नाही, पळवण्यात आलं"; ललित पाटीलचा मीडियासमोर खळबळजनक आरोप

सकाळ डिजिटल टीम

पुणे : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नई इथून अटक केली आहे. यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलं. यावेळी मीडियाच्या कॅमेरॅसमोर बोलताना मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नाही तर मला पळवण्यात आलं, असा खळबळजनक आरोप त्यानं केला आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे. (Drugs Case I didnt run away from Sassoon I was kidnapped Sensational allegation by Lalit Patil)

चेन्नईतून अटक

मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांना हवा असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलं. (Latest Marathi News)

दरम्यान, कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याला चेहऱ्यावर कपडा टाकून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येत होतं. यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असताना एबीपी माझ्याच्या कॅमेऱ्यासमोर ललित पाटील यानं खळबळ आरोप केला.

"मी ससूनमधून पळून गेलो नाही तर मला पळवण्यात आलं. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे सर्व सांगेन" असं त्यानं म्हटलं. (Marathi Tajya Batmya)

नाशिकमध्ये ड्रग्जचा कारखाना

दरम्यान, ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील हे दोघे मूळचे नाशिकचे असून त्यांनी त्याठिकाणी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरु केला होता. या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापेमारी केल्यानंतर त्या ठिकाणी सुमारे २०० किलो ड्रग्ज आढळून आल्याचा दावा करण्यात आला होता.

तत्पूर्वी ललित पाटील गेल्या नऊ महिन्यांपासून पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार घेत होता. त्यानंतर पोलिसांच्या हातावर तुरी देत तो पळून गेल्याचं सांगितलं जात होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन राजकीय घराण्यात पुन्हा अस्तित्वाची लढाई; शंभूराज देसाई-पाटणकरांमध्ये अटीतटीची लढत, देसाई साधणार हॅट्‌ट्रिक?

Ola Electric: कुणाल कामरा आणि ओलाचे सीईओ यांच्यातील वाद वाढला; 'ते' ट्वीट पडलं महागात, कंपनीचे शेअर्स कोसळले

Latest Maharashtra News Updates Live : शिवसेना UBT - काँग्रेस वादावर शरद पवार आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी?

Nandurbar Vidhan Sabha Election 2024: इच्छुकांना लागली पक्षीय जागा वाटाघाटीची प्रतिक्षा; चारही मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी

Aadhaar Card Tips : आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक केलेला हे विसरलात? एका क्लिकवर करा नंबर लिंकचं काम

SCROLL FOR NEXT