मुंबई

नेटफ्लिक्सच्या दोन दिवसाच्या विनामूल्य सेवेमुळे OTT प्लॅटफॉर्म्समध्ये वाढणार चुरस

संतोष भिंगार्डे

मुंबई : नेटफ्लिक्सने आपले भविष्यातले सबस्क्राईबर्स वाढविण्यासाठी आज (ता. ५) आणि उद्या (ता. ६)  भारतात 'स्ट्रीमफेस्ट'चे आयोजन केले आहे. या स्ट्रीमफेस्टच्या माध्यमातून नॉन सबस्क्राईबर्सना नेटफ्लिक्स दोन दिवस विनामूल्य सेवा पुरविणार आहे. याचा पुरेपूर फायदा प्रेक्षक उचलताना दिसत आहेत. मात्र यामुळे ओटीटी प्लॅटफाॅर्मवर विनामूल्य सेवा देण्याची स्पर्धा अधिक तीव्र होणार असल्याचे दिसते आहे. अन्य प्लॅटफाॅर्मदेखील असेच एखादे पाऊल उचलून आपले सबस्क्राईबर्स वाढविण्याचा प्रयत्न भविष्यात नक्कीच करतील अशी चिन्हे दिसत आहेत.  

गेल्या तीन-चार वर्षांत आपल्या देशात ओटीटी प्लॅटफॉर्म हे एक प्रभावी माध्यम तयार झाले आहे. सध्या नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी 5, वूट असे विविध ओटीटी प्लॅटफॉर्म्स उत्तमोत्तम कलाकृती निर्माण करून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याच्या शर्यतीत उतरले आहेत. या शर्यतीत पुढे जाण्यासाठी प्रत्येक जण नवनवीन कल्पना वापरताना दिसतात. लाॅकडाऊनच्या काळात हे माध्यम अधिक सशक्त झाले. अनेक हिंदी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले. त्यामुळे एक प्रकारची स्पर्धा पाहायला मिळाली. त्यातच आता नेटफ्लिक्सने आपले भविष्यातले सबस्क्राईबर्स वाढवण्यासाठी भारतात दोन दिवस 'स्ट्रीमफेस्ट'चे आयोजन केले. या स्ट्रीमफेस्टच्या माध्यमातून नॉन सबस्क्राईबर्सना नेटफ्लिक्स दोन दिवस विनामूल्य सेवा पुरविणार आहे. याचा पुरेपूर फायदा प्रेक्षक उचलताना दिसत आहेत.

द ऑफिस, द क्राऊन, ल्युसीफर, मनी हाईस्ट, डार्क अशा परदेशी सिरीज तसेच दिल्ली क्राईम, शी, लिटिल थिंग्स अशा भारतीय सिरीज आणि नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेले प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपट यांच्यावर प्रेक्षक तुटून पडले आहेत. पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत भारतात असंख्य युजर्सनी नेटफ्लिक्स वापरल्याचे स्पष्ट झाले असून हा आकडा दुसऱ्या दिवशी आणखी वाढणार आहे.  

याबाबत लेखक आणि दिग्दर्शक सचिन दरेकर म्हणाला, की भारतातील सर्वसामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचता यावे याकरिता नेटफ्लिक्सने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता अन्य ओटीटी प्लॅटफाॅर्मदेखील काही तरी नवीन कल्पना राबवतील हे निश्चित. अलीकडे अमुक एखाद्या कंपनीचे सीमकार्ड घेतले तर अमुक ओटीटी प्लॅटफाॅर्म एक महिना मोफत अशा योजना अधेमधे असतात. परंतु आता ही स्पर्धा आणखीन वाढेल. कारण भविष्यात हा प्लॅटफाॅर्म आपल्याकडे भक्कम पाय रोवणार आहे आणि त्याकरिता त्यांना अशा काही कल्पना राबवाव्या लागणारच.

( संपादन - सुमित बागुल )

due to netflix stream fest competition between OTT platforms may increase

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: सोनं झालं 5,000 रुपयांनी स्वस्त; अवघ्या 15 दिवसांत सोन्याच्या भावात मोठी घसरण, आज काय आहे भाव?

वर्तुळ पूर्ण! Tim Southee ची कसोटी मधून निवृत्ती; ज्या संघाविरुद्ध पदार्पण, त्यांच्याविरुद्धच शेवटचा सामना

Latest Maharashtra News Updates : 'कटेंगे तो बटेंगे' हा देशाचा इतिहास- देवेंद्र फडणवीस

Dehradun Accident: देहराडूनमध्ये भीषण अपघात, सहा तरुणांचा मृत्यू; काय आहे इनसाईड स्टोरी? पोलिसांकडे अद्याप तक्रार नाही

IND vs AUS: विराट कोहली जखमी? काल अचानक स्टार फलंदाज ऑस्ट्रेलियातील हॉस्पिटलमध्ये गेला अन्...

SCROLL FOR NEXT