mumbai municipal commissioner Iqbal singh Chahal esakal
मुंबई

Mumbai News : धूळ व प्रदूषण नियंत्रण उपाययोजना न केल्यास बांधकामे रोखणार; आयुक्तांचा कारवाईचा इशारा

मुंबईत प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. बांधकामा ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जाते आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईत प्रदूषणाची समस्या भेडसावत आहे. बांधकामा ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. याची गंभीर दखल घेत बांधकामा ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजना करा अन्यथा खासगी असो किंवा शासकीय, अशा बांधकामांना रोखण्यात येईल, असा सक्त इशारा मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिला आहे.

धूळ व प्रदूषण नियंत्रणाची नवीन मार्गदर्शक तत्त्वे येत्या २३ ऑक्टोबरपर्यंत जारी केली जाणार आहेत. त्यांचे पालन सर्व घटकांनी व यंत्रणांनी न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त चहल यांनी दिली आहे.

मुंबईत सध्या सहा हजार ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. या सर्व बांधकामांच्या ठिकाणी धूळ व प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. याचा परिणाम म्हणून हवेतील प्रदूषणात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्याबाबत महानगरपालिकेतील सर्व संबंधित खात्यांसह एमएमआरडीए, म्हाडा, एसआरए, एमएमआरसीएल, एमआयडीसी आदी यंत्रणा तसेच क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या विकासकांच्या विविध संघटनांची संयुक्त बैठक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. या बैठकीत आयुक्त चहल यांनी धूळ व प्रदूषण नियंत्रासाठीचे विविध निर्देश दिले आहेत.

या बैठकीला प्रधान सचिव (मुख्यमंत्री कार्यालय) विकास खारगे, अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे, म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच बांधकामे व विकास क्षेत्रातील क्रेडाई, एमसीएचआय, नारेडको, पीइएटीए या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उपायोजनेबाबत सुचना

- एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान ३५ फूट उंचीचे लोखंडी- पत्र्यांचे आच्छादन असावे. संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेले असावे.

- बांधकामाच्या ठिकाणी तुषार फवारणी यंत्रणा असावी. दिवसातून किमान ४-५ वेळा पाण्याची फवारणी करावी.

- बांधकामाच्या ठिकाणी पुढील १५ दिवसांत धूळ प्रतिबंधक यंत्र बसवावे.

- प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी.

- मेट्रो, रस्ते, उड्डाणूपल आदी शासकीय निर्माणाधीन कामाच्या ठिकाणीही ३५ फूट उंचीच्या आच्छादनांसह तुषार फवारणी व धूळ प्रतिबंधक संयंत्रांची व्यवस्था असावी.

- मेट्रो रेल्वेची बांधकामे सुरु असणाऱया ठिकाणी संबंधित यंत्रणांनी परिसरातील हवेच्या गुणवत्तेवर अधिक लक्ष देवून उपाययोजना कराव्यात.

- इमारती अथवा कोणतेही बांधकाम पाडतानासुद्धा आजुबाजूने आच्छादन करुन नंतरच बांधकाम पाडावे

- बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांसाठी मास्क, चष्मा आदी संरक्षण साहित्य दिले जावे.

- प्रत्येक विभागात पथके तैनात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT