health department recruitment exam sakal
मुंबई

आधी परीक्षा रद्द, आता सेंटर लांबचे

मुलांच्या मानसिकतेचा विचार करून राज्य सरकारने केंद्र ठरवायला हवे होते; पालक, विद्यार्थ्यांची मागणी

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला असतानाच आता लांबचे परीक्षा केंद्र आल्याने विद्यार्थी नाराज झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना जवळचे परीक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणी पालक, विद्यार्थी करत आहेत.

महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य विभागाच्या परीक्षा सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र शासनाकडून ही परीक्षा ऐन वेळी पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला होता. ही परीक्षा परत कधी होणार, होणार की नाही याविषयी विद्यार्थी, पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. अखेर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी 24 व 31 ऑक्टोबर ला आरोग्य विभागाची परीक्षा होणार असल्याचे जाहीर केले आणि विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात पडला. मात्र विद्यार्थ्यांना परीक्षेचे केंद्र हे लांबचे आल्याने काही विद्यार्थी, पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील आनंदनगर परिसरात राहणारे चंद्रकांत राणे यांची मुलगी प्रणाली हीने आरोग्य विभागात केमिकल असिस्टंट विभागासाठी अर्ज भरला आहे. सप्टेंबर मध्ये जाहीर झालेल्या परीक्षेच्या वेळी डोंबिवलीतीलच प्रगती कॉलेज हे सेंटर डोंबिवलीतील विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. मात्र ती परीक्षा रद्द झाली, आता पुणे येथील सेंटर प्रणालीला देण्यात आले आहे. पुणे येथे जायचे कसे, रेल्वेने प्रवास करण्यास मुभा मिळेल का ? कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही संपलेला नाही. यामुळे मुलांना जवळचेच केंद्र दिले पाहिजे होते अशी मागणी त्यांनी केली. पुणे येथे कोणी ओळखीचे नाही, परीक्षेच्या आधी प्रवास करून जाणे त्या तणावात परीक्षा देणे अवघड असल्याचे प्रणालीचे देखील म्हणणे आहे.

तर आणखी एका मुलाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, कोरोनामुळे आमची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. मला देखील पुणे येथील केंद्र आले आहे. रात्री जाऊन थोडं फ्रेश डोक्याने परीक्षा द्यायचा विचार केला तरी त्या खर्चासाठी पैसे जमवाजमव करावी लागेल. इथे रेल्वे तिकिटाचे पैसे जमवताना नाकी नऊ आले असताना बाकी पैसे कोठून आणायचे. मुलांना जर जवळचेच केंद्र दिले गेले असते तर सर्वानाच सोयीचे झाले असते असे त्याचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT