मुंबईः उत्तर मुंबईत पहाटेच्या सुमारास २.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवल्याचं समजतंय. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईला सौम्य भूकंपाचे धक्के बसले आहेत. पालघरनंतर आता मुंबई आणि नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के बसले. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. पालघरमधील बोर्डी झाई परिसरात शुक्रवारी मध्यरात्री एकापाठोपाठ एक दोन भूकंपाचे धक्के जाणवले.
पहिला भूकंपाचा धक्का ११ वाजून ४२ सेकंदच्या दरम्यान बसला. २८ मिनिटाच्या अंतराने १२ वाजून ५ मिनिटांनी भूकंपाचा दुसरा मोठा धक्का बसला. या धक्क्याची तीव्रता जबरदस्त असल्यामुळे मध्यरात्री नागरिक घाबरुन होऊन जागे झाले आणि घराबाहेर आले.
मुंबईत 24 तासांत दोन वेळा भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. उत्तर मुंबईमध्ये शनिवारी सकाळी 6.36 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. 2.7 रिश्टर स्केल भूकंपाची तीव्रता असल्याची माहिती मिळाली आहे. पालघर जिल्ह्यात येणाऱ्या भूकंपानंतर आता मुंबईतही भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. दुसरीकडे भूकंपाच्या धक्क्यांनी नाशिक हादरलं आहे.
याआधी गेल्या महिन्यात पालघरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. पालघरमध्ये झालेल्या या सौम्य भूकंपामुळे कोणतंही नुकसान झालं नाही. पालघर जिल्ह्यात 2.8 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेची हानी झाली नव्हती.
Earthquake magnitude 2.7 occurred 98 km north of Mumbai
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.