मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची नुकतीच सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच ED ने चौकशी केली. मुंबईतील ED कार्यालयात तब्बल सात तास प्रताप सरनाईक यांची चैकशी करण्यात आली. दरम्यान, ED ने जेंव्हा प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि ऑफिसवर धाड टाकली तेंव्हा ED ला पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडले असल्याची बातमी समोर येतेय. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे. जेंव्हा ED ने प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि ऑफिसवर छापेमारी केली तेंव्हा ED ला एक पाकिस्तानी क्रेडिट कार्ड आढळून आले होते. या क्रेडिट कार्डवर प्रताप सरनाईक यांचा पत्ता आहे, अशा बातम्या प्रसारित झालेल्या. .
Powerat80 : डॉक्टरांनी सांगितलं होतं, "तुमच्याकडे केवळ ६ महिने शिल्लक आहेत"; यावर शरद पवार म्हणाले होते...
दरम्यान, याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता संजय राऊत म्हणालेत की, "ही केवळ चर्चा आहे, असं काही असेल तर अधिकृतपणे सांगावं. आमचे प्रताप सरनाईक हे या प्रश्नांना उत्तर देण्यास समर्थ आहेत" अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार प्रताप सरनाईक यांच्या घरी सापडलेलं क्रेडिट कार्ड हे सिंथिया दाद्रस यांच्या नावाने आहे. हे कार्ड कॅलिफोर्निया मधील फेयरमॉन्ट बँकेकडून देण्यात आलं आहे. मात्र यावर सरनाईक यांचा पत्ता आहे. यामुळे प्रताप सरनाईक पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे अशा बातम्या चालवल्या गेलेल्या .
प्रताप सरनाईक यांचा खुलासा
प्रताप सरनाईक यांनी या बातम्यांचे खंडन केले आहे. ज्या माध्यमांनी अशा खोट्या बातम्या चालवल्या आहेत त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठिकणार असल्याचं प्रताप सरनाईक म्हणाले आहेत. दरम्यान ED कडूनही आपल्याला कोणताही समन्स आलेला नाही यावरही सरनाईक यांनी खुलासा केला आहे.
ED found pakistani credit card with the address of pratap sarnaik sanjay rauts reaction
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.