मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना आलेल्या ED नोटिशीवर संजय राऊतांच्या कडक भाषेत प्रतिउत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी आपल्या पत्रकार परिषदेमधून भारतीय जनता पक्षावर सडेतोड टीका केली आणि काही गंभीर आरोप देखील केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला.
संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील सर्व महत्त्वाचे मुद्दे
- आमच्यासाठी ED हा महत्वाचा विषय नाही
- CBI, इन्कनटॅक्स, ED या संस्था एकेकाळी प्रतिष्ठित मानल्या जायच्या. ज्यांची कारवाई म्हणजे काहीतरीगंभीर वाटायचं
- गेल्या काही दिवसांपासून एखाद्या राजकीय पक्षाने आपली धाडस काढणं हे लोकांनी गृहीत धरलंय
- सत्तेतल्या राजकीय पक्षाला विरोधकांना राजकीय दृष्ट्या संपवता येत नाही, तेव्हा अशा संस्थांची हत्यारं वापरावी लागतात
- शरद पवार, प्रफुल पटेल, एकनाथ खडसे यांना नोटीस आलीय
- माझ्या नावाचा गजर, प्रताप सरनाईक यांना, प्रमुख लोकांना जे सत्ता बनवताना होते या लोकांना दबावाला बळी पाडण्यासाठी कागदाचे गोळे पाठवतात
- राजकारणात समोरासमोर लढायचं असतं. घरातल्या मुलांवर, महिलांवर हल्ले करणारे नामर्दाची औलाद
- असं कुणी करत असेल तर शिवसेना त्याचपद्धतीने उत्तर देईल
- आम्ही घाबरत नाही, घाबरण्याचे कारण नाही
- जर कोणी काही केलं नसेल तर नोटीस येत नाही हे फडणवीसांचं वाक्य
- नोटीशी येऊ द्या, नाहीतर काहीही येऊ द्या आम्ही नाही घाबरत
- याबाबत उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झालीय
- गेल्या महिन्यापासून ED आमच्यासोबत पत्रव्यवहार करत आहे, आम्ही त्यांना सगळी कागदपत्र दिलेली आहेत
- भाजपची माकडे आम्ही अनेक काळापासून पाहत आहोत, ते उद्या मारत आहेत
- ED मध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही मिळत
- पण भाजपची 3 लोकं इडी कार्यालयात जाऊन कागदपत्र बाहेर काढतात, त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत
- गेल्या 1 वर्षांपासून भाजपचे काही हस्तक माझ्याशी भेटण्याचा प्रयत्न करत आहे
- महाराष्ट्राचे सरकार टिकू देऊ नका, मोहात पडू नका, हे सरकार पाडायचे आहे असं सांगण्यात आलं
- मला धमकवण्याचाही प्रयत्न केला. आमचे जवळचे लोक, शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 22 लोकांची यादी आहे. त्यांना ताब्यात घेऊन त्यांना राजीनामे घेण्याचे प्रयत्न करून सरकार पाडलं जाईल
- प्रताप सरनाईक हे त्याचे टोकन आहेत
- नोव्हेंबरमध्ये सरकार पडण्याची डेडलाईन होती
- पण आता घरच्यांना नोटिसा पाठवून त्रास देण्याचा प्रयत्न
- नोटीस पाठवा, वा अटक करा पण सरकार पडणार नाही
- बायकांच्या पदाराआडून लढाई करण्याची खेळी तुमच्यावर उलटणार
- 12 वर्षांपूर्वी शिक्षिका असलेल्या मध्यमवर्गीय स्त्रीला घर घेण्यासाठी मैत्रिणीकडून कर्ज घेतला आणि तुम्ही नोटीस पाठवता?
- भाजपचे अकाऊंट उघडा, HDIL ने 3 वर्षात भाजपला किती देणग्या दिल्यात हे आधी जाहीर करा
- माझ्याकडे 20 कोटी चा हिशोब आहे. आमच्यापैकी कोणाची संपत्ती 1600 कोटीने वाढली, त्याचा हिशोब मागा आधी
- कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही मी पण नाही. आम्ही कायद्याचे पालन करतो आम्हाला नियम माहीत आहे
- पण तुमच्या चौकशा कोण करणार? तुमचे हिशोब कोण पळणार?
- मी तोंड उघडलं तर तर हादरे बसतील. तुमच्या संपत्तीचे मुलाबाळांचे हिशोब आमच्याकडे आहेत, पण आम्ही कुटुंबालामध्ये आणणार नाही
- करायचं झालं तर आम्हाला तुमचं वस्त्रहरण करावं लागेल
- राजकीय सुदाबाबत असेल तर राजकीय उत्तर दिलं जाईल, हे प्रकरण तुम्हाला महाग पडेल
- पत्नी उपस्थित राहणार का, हा निर्णय अजून घेतला नाही. निर्णय सर्वांशी बोलून घेतला जाईल. पवार साहेबांशी आणि पक्षप्रमुखांशी बोलणार
- माझ्याकडे भाजपच्या 120 नेत्यांची यादी तयार आहे त्याबाबत इडी काय करणार हे लवकरच कळेल
- जो उखाडना है उखाडो
ed notice to varsha sanjay raut 35 points discussed in press conference by sanjay raut
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.