Anil Deshmukh comforted 
मुंबई

ईडीकडून अनिल देशमुखांना समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

ईडीकडून अनिल देशमुखांना समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश मालमत्तांवर छापेमारीनंतर शुक्रवारी देशमुखांच्या दोन स्वीय्य सहाय्यकांना अटक ED Summoned Anil Deshmukh in Parambir Singh Sachin Waze Bar owners Extortion Case

विराज भागवत

मालमत्तांवर छापेमारीनंतर शुक्रवारी देशमुखांच्या दोन स्वीय्य सहाय्यकांना अटक

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (ANil Deshmukh) यांच्यावर खंडणी वसुलीला (Extortion) भाग पाडल्याचे आरोप माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh Letterbomb) यांनी केले होते. या आरोपांवरून शुक्रवारी ईडीने (ED) त्यांच्या विविध मालमत्तांवर छापेमारी (Raid) केली. मुंबईतील (Mumbai) तीन आणि नागपूरमधील (Nagpur) दोन अशा एकूण पाच ठिकाणी ईडीने छापा मारला अशी माहिती आहे. या छापेमारीत ईडीला काही महत्त्वाचे पुरावे (Evidence) मिळाल्यामुळे देशमुखांचे दोन्ही स्वीय्य सहाय्यक (PA) संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना ईडीने अटक केली. ईडीची कारवाई तिथेच थांबलेली नसून ईडीने अनिल देशमुखांनादेखील समन्स (Summons) बजावले आहे आणि चौकशीसाठी (Inquiry) शनिवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (ED Summoned Anil Deshmukh in Parambir Singh Sachin Waze Bar owners Extortion Case)

ईडीने अनिल देशमुखांच्या घरी शुक्रवारी दिवसभर कारवाई केली. त्यानंतर ईडीच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागल्याचे कळले. त्यातच देशमुखांचे दोन स्वीय सहाय्यक अटक झाले. पाठोपाठ आता या प्रकरणात ईडीने थेट अनिल देशमुखांना समन्स बजावले असून चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीच्या कारवाईला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी शुक्रवारी सांगितले होते. त्यानंतर आज सकाळी सुमारे ११ वाजता अनिल देशमुख यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ईडीच्या धाडसत्रानंतर अनिल देशमुख म्हणाले...

"आज ईडीचे अधिकारी चौकशीसाठी आले होते. ईडीला संपूर्ण सहकार्य केलं आहे आणि इथून पुढेही करत राहू. परमबीर सिंह यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. परमबीर सिंह यांनी त्यांना आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर आरोप केले आहेत. पदावर असताना आरोप केले नाहीत. त्यांना जर आरोप करायचेच होते, तर त्यांनी आयुक्त पदावर असताना करायला हवे होते. परमबीर सिंह यांची आयुक्त म्हणून भुमिका संशयास्पद होती. सध्या अटकेत असणारे सचिन वाझे, रियाझुद्दीन काझींसह पाच अधिकारी परमबीर सिंग यांनाच रिपोर्ट करत होते. त्यामुळे त्यांच्या या संशयास्पद भूमिकेमुळे त्यांना पोलिस आयुक्त पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी हे आरोप केले आहेत. सध्या NIA तपास करत आहे. सत्य लवकरच समोर येईल", अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी काल दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: संविधान नसतं तर..? राहुल गांधींनी फुले आंबेडकरांची आठवण काढत केली RSS वर टीका

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

SCROLL FOR NEXT