education Cambridge School Lessons in agriculture and environmental sensitivity to children  sakal
मुंबई

Mumbai News : पालिकेच्या केंब्रिज शाळेच्या शहरी शेतीची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - पर्यावरणीय बदलांबाबतचे शिक्षण हे केवळ पुस्तकी मर्यादित न ठेवता या शिक्षणाचा दैनंदिन आयुष्यात वापर करण्यासाठीचे धडे महानगरपालिकेच्या माटुंगा येथील एल. के. वाघजी केंब्रिज शाळेचे विद्यार्थी प्राथमिक शिक्षणातच घेत आहेत.

विद्यार्थ्यांच्या पर्यावरणाशी संवेदनशील उपक्रमाची दखल ही आंतरराष्ट्रीय पातळीवर कॅनडाच्या दुतावासाने घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सुमारे पाच देशांनी या शाळेसोबत करारही केला आहे.

पर्यावरणाबाबत संवेदनशीलतेचे धडे देण्यासाठी गत वर्षभराच्या कालावधीत माटुंग्याच्या एमपीएस एल. के. वाघजी शाळेच्या माध्यमातून विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक, पालकांचा आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचाही सहभाग होता.

नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या १५४ मुलांच्या सहभागातूनच नैसर्गिक आणि सेंद्रीय शेतीची संकल्पना राबवण्यात आली. तसेच शहरी शेतीमध्ये छतावरील (रूफ) गार्डनिंगलाही प्रोत्साहन देण्यात आले. या सर्व पुढाकाराची दखल घेऊनच कॅनडाच्या भारतातील दुतावासाचे अधिकारी मायकल यांनी माटुंग्याच्या शाळेला भेट दिली. या प्रकल्पाची माहिती समजून घेतानाच विद्यार्थ्यांनी राबवलेल्या संकल्पनांचेही त्यांनी कौतुक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT