Eknath Shinde : पावसाळा म्हटले की जलजन्य आजारासह साथीचे आजार डोके वर काढतात. अश्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात साथीच्या आजाराचे थैमान पाहायला मिळत आहे.
जानेवारी २०२३ ते जुलै २०२३ या सहा महिन्यांच्या कालावधीत ठाणे पालिका क्षेत्रात मलेरियासह डेंगी, हगवण आणि अतिसार या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले होते. तर ऑगस्ट २०२३ मध्ये अवघ्या १७ दिवसांत डेंगीचे १४ तर मलेरियाचे ६७; तर लेप्टोचे दोन रुग्ण आढळून आले आहेत.
जुलै महिन्यात लेप्टोचा एक बळी गेल्याची माहिती समोर आली. त्यामुळे ठाण्यात डेंगी मलेरियासह साथीच्या आजाराने थैमान घातले असल्याचे दिसून येत आहे.
ठाणे शहरात पावसाळ्याच्या काळात साथीचे आजार उद्भवू नये, याकरिता पालिका प्रशासनाकडून झोपडपट्टी भागात औषध, धूरफवारणी करणे, चाळींमध्ये पाण्याच्या ड्रमची तपासणीदेखील करण्यात येत असते.
तसेच पालिकेच्या आरोग्य केंद्रांमध्ये औषधांचा मुबलक साठा सज्ज ठेवण्याबरोबरच डॉक्टरांची टीम देखील सतर्क ठेवण्यात येत आहे. असे असताना, जुन महिन्यापाठोपाठ जुलै महिन्यातही साथीच्या आजारांनी डोके वर काढल्याचे दिसून आले.
याची दखल घेत, पालिका प्रशासनाकडून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. तर ज्या दूषित पाणी आढळून आले, तसेच जे कंटेनर दूषित आढळले त्या कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते जुलै २०२३ या कालावधीत ठाणे महापालिका हद्दीत डेंगीचे ३०, मलेरिया २४७, अतिसाराचे १,७५६ आणि हगवणचे २२३ रुग्ण आढळून आले. तसेच लेप्टोचे ५ रुग्ण आढळून आले असून जुलै महिन्यात एका रुग्णाचा मृत्यू झाला असल्याची बाब समोर आली आहे.
१ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट महिन्यात डेंगी आणि मलेरिया या आजाराने थैमान घातले असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या १७ दिवसात डेंगीचे १४; तर मलेरियाचे ६७, लेप्टोचे दोन रुग्ण आढळून आले असून एच३एन२ चे ७२ रुग्ण आढळून आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.