वृद्ध दाम्पत्यांना मिळाले जीवदान Sakal
मुंबई

Mumbai News : वृद्ध दाम्पत्यांना मिळाले जीवदान; आरपीएफ जवानाची सतर्कता, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

धावत्या ट्रेनमधून चढत असताना वृद्ध महिला प्रवाशाचा तोल गेल्याने रेल्वे खाली जाणाऱ्या या आजीचे प्राण कर्तव्यावर असलेल्या एका आरपीएफ जवानाने वाचवले. ही घटना बोरिवली रेल्वे स्थानकात घडली असून हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई :धावत्या ट्रेनमधून चढत असताना वृद्ध महिला प्रवाशाचा तोल गेल्याने रेल्वे खाली जाणाऱ्या या आजीचे प्राण कर्तव्यावर असलेल्या एका आरपीएफ जवानाने वाचवले. ही घटना बोरिवली रेल्वे स्थानकात घडली असून हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

पश्चिम रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री १२. २१ वाजता बोरिवली स्थानकांच्या फलाट क्रमांक ६ वर एकता नगर सेमीफास्ट एक्सप्रेस आली हाती. एक वृद्ध दाम्पत्य ट्रेनच्या स्लीपर क्लासमध्ये आरक्षण केले होते.

परंतु ट्रेन प्लॅटफॉर्म आल्यानंतर वृद्ध दाम्पत्य एसी कोचमध्ये चढले. सामना डब्यात ठेवल्यानंतर त्यांना कळले की आपले आरक्षण स्लीपर डब्याचे आहे. त्यानंतर वृद्ध दाम्पत्य ट्रेन खाली उतरून स्लीपर डब्यात चढत होते. त्याचवेळी रेल्वे गाडी सुरु झाली.

धावत्या रेल्वे गाडीत चढण्याच्या प्रयत्नात एक वयोवृद्ध पुरुष प्रवासी आणि एक वयोवृद्ध महिला प्रवासी कोच आणि प्लॅटफॉर्ममध्ये घसरले. ते पाहून कर्तव्यावर असलेल्या एस्कॉर्ट टीमचे प्रभारी सहायक पोलीस उपनिरीक्षक आशिष बिर्ले धावत्या ट्रेनमधून खाली उतरले.

उतरल्यानंतर त्या वृद्ध महिलेला सुखरूप बाहेर काढले. तिला पाहताच वृद्ध पुरुषही धावत्या ट्रेनमधून उडी घेतली. सुदैवाने सहप्रवाशांनी प्लॅटफार्म आणि रेल्वे गाडी बाजून बाजूला खेचले त्याच्या दोघांचे प्राण वाचले आहे. त्यानंतर वृद्ध दाम्पत्याना आरपीएफ पोलिसांनी गाडीत बसवून देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT