मुंबई

निवडणूक कार्यक्रम कधी? केडीएमटी सभापतीपदाचे भिजत घोंगडे  

रवींद्र खरात

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन (केडीएमटी) समिती सभापती निवडणुकीचा कार्यक्रम तांत्रिक कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे. या सभापती पदाची निवडणूक सोमवारी होणार होती. आता तांत्रिक कारणाने निवडणूक घोषित करण्याचा कार्यक्रम पुढे ढकलला आल्याने सभापतीपदाला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल विचारला जात आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांचा कालावधी संपल्याने सभापती पदाची निवडणूक फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. मधल्या काळात कोकण विभाग आयुक्तांनी ऑनलाईन निवडणूक घेण्यास परवानगी देत पिठासीन अधिकारी म्हणून पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांची नेमणूक केली होती. 

निवडणूक ऑन लाईन होणार असल्याने पालिका सचिव संजय जाधव यांनी ऑनलाईन प्रात्यक्षिकही घेतले होते. त्यानुसार सोमवारी (ता. 5) परिवहन समिती सभापती निवडणूक कार्यक्रम घोषित होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक कारणास्तव निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. 

इच्छुकांमध्ये नाराजी 
परिवहन समितीमध्ये शिवसेना-भाजपा युती असून सभापती पद एक-एक वर्ष दोन्ही पक्षाने वाटून घेतले होते. शिवसेनेचे सभापती मनोज चौधरी यांचा एक वर्षाचा कालावधी संपल्याने हे पद भाजपकडे जाणार होते. समितीमधील पक्षीय बलाबल पाहता भाजपचे पारडे जड होते. जो कोणी सभापती पद घेईल त्याला पाच महिन्यांचा कालावधी मिळणार होता. फेबुवारी आणि मार्च 2021 मध्ये अनेक सदस्य निवृत्तही होणार होते. मात्र, निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

-------------------------
(संपादन : प्रणीत पवार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : पोलिस असल्याच्या बहाण्याने सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT