Strike Sakal media
मुंबई

वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा

तेजस वाघमारे

मुंबई : वीज कंपन्यातील (Electric company) प्रलंबित विविध मागण्या अनेक वर्ष प्रलंबित असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने आंदोलन (strike) सुरु केले होते. संघटनेच्या मागण्यांबाबत (workers union demands) महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (vijay singhal) यांनी बैठक घेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत संघटनेला सकारात्मक आश्वासन दिले. त्यानंतर संघटनेने आपले आंदोलन (strike stops) मागे घेतले आहे.

महानिर्मिती,महापारेषण व महावितरण या तीनही कंपन्यातील प्रलंबित मागण्यांबाबत प्रशासनास आंदोलनाची नोटीस दिली होती. त्यानुसार 8 ऑक्टोबर रोजी वीज कामगार, अभियंते यांनी प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरात निदर्शने केली होती. यानंतर 12 ऑक्टोबर रोजी राज्यातील सर्व झोन समोर होणाऱ्या धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनाची दखल घेत महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.

या भेटीत रिक्त पदे भरण्याची भरण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्यात येईल. प्रतीक्षा यादीतील उपकेंद्र सहाय्यक यांना सामावून घेण्यात येईल. तसेच विद्युत सहाय्यक यांची प्रतीक्षा यादी लवकरच लावण्यात येईल, पगारवाढ फरकाचा तिसरा हप्ता लवकरच देण्यात येईल, रजा रोखीकरणाचे पैसे टप्प्या-टप्प्याने 15 दिवसात देण्यात येईल अशी आश्वासने अध्यक्षांनी बैठकीत दिली.

तसेच सध्या महावितरण कंपनी अत्यंत आर्थिक अडचणीत आहे. या उद्योगावर आपले कुटुंब अवलंबून आहे. त्यामुळे महावितरण कंपनी टिकून राहण्याकरिता आपण सतत पणे कंपनीच्या व्यवस्थापनात सहकार्य करावे असे आवाहन सिंघल यांनी केले. या आवाहनानुसार संघटनेने आपले आंदोलन मागे घेतले, असे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉ.कृष्णा भोयर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

Pandharpur Vidhansabha: पंढरपूरात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Mobile Addiction : दिवाळीच्या सुट्टीत पालकांना ब्लॉक करून मुले रिल्स, गेम्सच्या आहारी....सोशल मीडियावर नको ते उद्योग

SCROLL FOR NEXT