मुंबई : देशभरात वीज खरेदी (electricity purchase) करून ती अन्यत्र पुरविणाऱ्या अदाणी ट्रान्समिशनच्या (adani transmission) एप्रिल ते जून या तिमाहीतील नफ्यात (profit increases) मागीलवर्षीच्या तुलनेत 22 टक्के वाढ झाली आहे. त्यांचा महसूल, युनिट्सची विक्री तसेच वितरण जाळेही वाढले आहे. ( electricity purchase-adani transmission-profit increases-nss91)
मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि. ची अदाणी ट्रान्समिशन ही मुख्य कंपनी असून ती देशभर विजेचे वहन आणि वितरण करते. त्यांना यावर्षीच्या एप्रिल ते जून या तिमाहीत 433 कोटी रुपये नफा झाला. त्यांच्या एकत्रित महसुलातही 18 टक्के वाढ होऊन तो दोन हजार 499 कोटींवर गेला. मागीलवर्षीच्या याच तिमाहीत तो दोन हजार 117 कोटी रु. तर जानेवारी ते मार्च 2021 या कालावधीत तो दोन हजार 276 कोटी रु. होता.
त्यांच्या एकत्रित महसुलातील मोठा वाटा वितरणचा (1,742 कोटी रु) होता. त्यातही मागीलवर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 21.2 टक्के वाढ झाली आहे. तर वहन क्षेत्राचा महसूल 11.4 टक्के वाढला. या तिमाहीत त्यांनी आपल्या वहन जाळ्यात 207 सर्किट किलोमीटर वाढ केली, त्यांनी मागीलवर्षीच्या याच तिमाहीत त्यात 74 सर्किट किलोमीटर वाढ केली होती. त्यांचा वीज वितरणातील तोटा (डिस्ट्रिब्यूशन लॉस) मागीलवर्षीच्या तिमाहीपेक्षा (13.47 टक्के) यावर्षी 6.59 टक्के कमी होऊन तो 6.88 टक्के झाला.
त्यांनी या तिमाहीत 203 कोटी 60 लाख विजेचे युनिट्स विकले, मागील तिमाहीत ही संख्या 172 कोटी 80 लाख युनिट्स होती. त्यांची या तिमाहीतील वीजबिल वसुली 100.58 टक्के (काही रक्कम आगाऊ मिळाली) झाली, मागीलवर्षीच्या याच तिमाहीत ती 71.85 टक्के होती. अदाणी ट्रान्समिशनचे वीज वितरणाचे एकूण जाळे 18 हजार 801 सर्किट किलोमीटर आहे. 2022 पर्यंत ही क्षमता 20 हजार सर्किट किलोमीटर करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे अदाणी ट्रान्समिशनचे एमडी व सीईओ अनिल सरदाना म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.