eleventh Admission sakal media
मुंबई

'या' कोट्यातील विद्यार्थ्यांनाही अकरावीसाठी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक

संजीव भागवत

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी (eleventh admission) कालपासून सुरू झालेल्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत (online admission) इन-हाउस, अल्पसंख्यांक व व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही (students)अकरावी ऑनलाइन प्रवेशाचा अर्ज (admission application) सादर करणे बंधनकारक आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रत्येक नोंद (admission details) शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे उपलब्ध होणार आहे.

मुंबई महानगर क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालय मध्ये अकरावीचे प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे पर्याय http://mumbai.11thadmission.org.in या संकेस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जे विद्यार्थी या मुंबई महानगर परिक्षेत्राच्या बाहेरून येऊन प्रवेश घेऊ इच्छित आहेत त्यांना एमएमआर व महाराष्ट्र राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना ओएमएस हा पर्याय संकेतस्थळावर देण्यात आला असून तो पर्याय निवडून विद्यार्थ्यांना आपला अर्ज भरता येणार आहे. शिवाय प्रत्येक मंडळाची माहिती भरण्याची मुभा आहे.

अकरावी प्रवेशासाठीची माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून मुंबई महानगर क्षेत्रांमध्ये 35 मार्गदर्शन केंद्रे निश्चित करण्यात आले आहेत. त्याची यादीही संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या मार्गदर्शन केंद्रात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी, त्रुटी यावर मार्गदर्शन केले जाणार असल्याचे शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांनी सांगितले.

अकरावी प्रवेशाचासाठी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रियाच्या फेऱ्या सुरू व गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आपल्याला कोणते महाविद्यालय मिळाले हे पाहण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या लॉगीन वरून मिळणार आहे. यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध असलेली माहिती पुस्तिका विद्यार्थ्यांनी नीट वाचावी असे आवाहन शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

असे आहे विशेष आरक्षण

अकरावी प्रवेशासाठी विशेष आरक्षण हवे असल्यास त्यासाठीची माहिती संकेतस्थळावर भरण्यासाठी वेगळे रकाने देण्यात आले आहेत विशेष आरक्षणामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 4 टक्के प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांसाठी 5 टक्के तसेच अनाथ मुलांसाठी एक टक्के आरक्षण या प्रवेश अकरावी प्रवेश देण्यात आले आहे. यासोबतच आजी, माजी सैनिकांचे पाल्य, आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावर सहभागी पदक विजेते तसेच राष्ट्रीय स्तरावर पदक विजेते असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 5 टक्के आरक्षणही या प्रवेशात देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT