मुंबई : ही बातमी वाचून तुमच्या डोळ्यात पाणी आल्यावाचून राहणार नाही. ही बातमी वाचून तुम्हाला तुमची दुःखं कदाचित ठेंगणी वाटतील. बातमी काळजाचा ठोका चुकवणारी.
तीरा कामत नामक एक पाच महिन्यांची लहानगी सध्या मुंबईतील एसआरसीसी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. तीराला एसएमए टाइप 1 हा आजार आहे. हा आजार अत्यंत दुर्मिळ असा आजार मानला जातो. या आजाराने ग्रस्त कोणतंही बाळ 18 महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकतं असं डॉक्टर्स सांगतात.
यावर उपचार अजिबात नाहीत असं नाही. या आजारावर एक इंजेक्शन आहे, जे तीराला यातून बाहेर काढू शकतं. मात्र या औषधाची किंमत ऐकाल तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तीराला जे इंजेक्शन हवं आहे त्याची किंमत तब्बल १६ कोटी रुपये इतकी. तीरासाठी खास अमेरिकेतून हे इंजेक्शन भारतात आयात करावं लागणार आहे. त्यामुळे त्यावरील आयात कर पकडून हे इंजेक्शन आणखीनच महाग होऊ शकतं.
महत्त्वाची बातमी : शरद पवार गरजले; 'सावरलेला पंजाब पुन्हा अस्वस्थतेकडे नेऊ नका'
नक्की काय आहे एसएमए टाइप 1 आजार ?
तीराच्या कुटुंबाकडून इंस्टाग्राम पेजच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या मदतीने निधी उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय. तीराच्या कुटुंबाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील मदत मागितली गेलीये.
तुम्हालाही तीराला मदत करायची असल्यास वरील इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन विविध डोनेशनच्या लिंक्स प्राप्त होऊ शकतात
किंवा
emotional story from mumbai teera kamat needs injection worth 16 crore to cure sma type one
तुमच्या मदतीशिवाय 'तीरा' तिचा दुसरा वाढदिवस साजरा करू शकणार नाही, काळजाचा ठोका चुकवणारी बातमी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.