Pradeep Sharma Arrested: अंबानी स्फोटक प्रकरण, मनसूख हत्या प्रकरणात नवा खुलासा
मुंबई: उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटके प्रकरण (Antlia Case) आणि मनसूख हिरेन हत्या प्रकरणात (Mansukh Hiren Murder Case) दररोज नवीन खुलासे होत आहेत. याच प्रकरणात शिवसेना नेते (Shivsena Leader) आणि मुंबई पोलिस दलात एन्काऊंटर स्पेशालिस्ट (Encounter Specialist) म्हणून ओळख असलेल्या प्रदीप शर्माला (Pradeep Sharma) NIA ने अटक केली. सकाळपासून NIA ने त्याच्या मुंबईतील घरात छापा (Raid) मारला होता आणि शोधमोहिम सुरू होती. तशातच दुपारच्या सुमारास त्याला अटक (Arrest) करण्यात आली. प्रदीप शर्माने गुन्ह्यातील पुरावे नष्ट (Destroying Evidence) करण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्याला आजच स्पेशल कोर्टात (Special Court) हजर केले जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. (Encounter specialist of Mumbai Police and Shiv Sena leader Pradeep Sharma arrested by NIA in Mansukh Hiren Murder Case)
प्रदीप शर्मा याला मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटक केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. मनसुख प्रकरणात प्रदीप शर्मा यांना NIA ने आधी एक-दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र आज सकाळी अचानकच प्रदीप शर्माच्या मुंबईतील अंधेरी येथील घरावर NIA ने छापा टाकला. यावेळी काही महत्वाचे पुरावे NIAच्या हाती लागले आणि म्हणूनच प्रदीप शर्माला अटक करण्यात आल्याची चर्चा आहे. प्रदीप शर्माला NIA ने अटक केल्यानंतर स्पेशल कोर्टात हजर केले जाणार आहे. गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रदीप शर्मावर करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.