pradip sharma 
मुंबई

एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर NIA ने मारला छापा

कार्तिक पुजारी

मुंबई- एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं सापडली होती. त्यानंतर मनसुख हिरेन प्रकरणी एनआयए तपास करत आहे. एनआयएने प्रदिप शर्मा यांच्या अंधेरीच्या घरी छापा टाकला आहे. प्रदिप शर्मा आणि सचिन वाझे हे मित्र आहेत. शर्मा यांच्याबाबत काही लिंक मिळाल्या असल्याची माहिती आहे. सकाळी सहा वाजलापासून एनआयएची टीम प्रदिप शर्मा यांच्या घरी आहे. (Encounter specialist Pradeep Sharma house raided by nia)

सकाळी सहाच्या सुमारास कोणालाही सुगावा लागू न देता एनआयएने प्रदीप शर्मा यांच्या घरावर छापा मारला. विशेष म्हणजे याठिकाणी मोठा पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे. शिवाय केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलांनाही तैनात करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता एनआयएची टीम जेबीनगर मध्ये दाखल झाली. एनआयएची टीम, सीआरपीएफ १० ते १२ गाडया घटनास्थळी आहेत. याप्रकरणी चौकशी सुरु आहे. भगवान भवन या अंधेरीतील इमारतीत ही चौकशी सुरु आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आल्याने विविध तर्क लावण्यात येत आहे. अंधेरीतला हा उच्चभ्रू परिसर आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात फौजफाटा पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात निवृत्त पोलिस अधिकरी प्रदीप शर्मा याच्या घरी NIA नं कारवाई केली आहे. या प्रकरणात या पूर्वी शर्मा यांची सलग दोन दिवस चौकशी झाली होती. त्यावेळी शर्मा यांचा मोबाइलही ताब्यात घेतले होते असे सूञांनी सांगितलं.या प्रकरणात नुकतीच NIA नं संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक केली होती. संतोष हा शर्मांच्या जवळचा व्यक्ती असल्याचं बोललं जातं, बुधवारी पीएस फाऊंडेशनच्या दोघा जणांनाही NIA नं चौकशीला बोलावलं होतं. या प्रकरणात विनायक शिंदे आणि वाजे यांची अंधेरीत मिटिंग झाल्याचं बोललं जातं, त्यावेळी माजी पोलिस अधिकारी उपस्थित असल्याचं सांगितलं जातं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT