Anil Deshmukh ED Raid 
मुंबई

अनिल परबांच्या घरी ED ची छापेमारी; मुंबई, पुणे, कोकणात धाडी

सकाळ डिजिटल टीम

अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी आज पहाटेपासून सक्तवसुली संचलनालयाने छापेमारी सुरू केली आहे. यासोबत त्यांच्या वांद्र्यातील घरातही कारवाईला सुरुवात झाली असून राज्यातील एकूण सात ठिकाणी ही कारवाई सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. (ED Raids Anil Parab House)

किरीट सोमय्या यांनी केंद्रात अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली होती. सचिन वाझे आणि १०० कोटींच्या प्रकरणातही अनिल परब यांचं नाव समोर आलं होत. परबांचे पार्टनर संजय कदम यांच्या घरातूनही मोठं घबाड हाती लागलं होतं. मनी लॉंडरिंग प्रकरणातील ईडीच्या या कारवाईनंतर परब यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. (Anil Parab ED Raid)

महाराष्ट्राचे मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल परब यांच्या दापोली रिसॉर्टवर देखील छापेमारी सुरू झाली आहे. सध्या महाराष्ट्रा राज्यसभेच्या जागेवरून शिवसेना चर्चेत आली आहे. संभाजीराजेंना शिवसेनेने मतदान करण्यास नकार दिल्यानंतर आज संजय राऊत आणि संजय पवार राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहे. त्याआधीच ही कारवाई झाल्याचं पाहायला मिळतंय.

अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. पोलीस खात्यात बदल्यांचं रॅकेट अनिल परब यांच्यामार्फत सुरू असल्याचा संशय यंत्रणांना आहे. याआधी किरीट सोमय्या यांनी परबांवर परिवहन खात्यात पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केला होता. परिवहन खात्यातीत अधिकारी बजरंग खरमाटे ही व्यक्ती परबांचा वाझे असल्याचा आरोपही झाला होता. या.सोबत अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणातही परब यांचा पाय खोलात गेला आहे.

तसेच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय यंत्रणांना आहे. त्यातून या कारवाईला सुरुवात झाली आहे.

महत्वाचे मुद्दे

  • दापोली प्रकरणात एस वेगळी तक्रार दाखल केली आहे.

  • अनिल देशमुखांच्या प्रकऱणात परबांवर पोलीस बदल्यांचे आरोप

  • दापोलीची जागा एक कोटी रुपयात घेण्यात आली

  • ऑन पेपर बांधकामाचा खर्च १ कोटी दाखवण्यात आला

  • खरा खर्च सात कोटी झाला. मात्र काळा पैसा लपवण्यात आल्याचा ईडीला संशय

अनिल परब यांना दोन वेळा समन्स

शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांना ईडीने पुन्हा (ED notice to anil parab) एकदा समन्स बजावला. २८ सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास सांगितलं होतं. १०० कोटी वसुलीचे आरोप असलेल्या अनिल देशमुख प्रकरणी (Anil Deshmukh Case) चौकशीसाठी हे समन्स पाठवल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT