मुंबई : महापालिकेच्या सायन रुग्णालयात मृतदेहांच्या बाजूला रुग्णांवर उपचार केले जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वस्तरावरुन सायन रुग्णालयाच्या कारभारावर टीका केली गेली. आमदार नितेश राणे यांनी व्हिडिओ ट्विट हा प्रकार उघडकीस आणला होता. त्याची दखल घेत या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी चौकशी समितीची नियुक्ती केली आहे. या प्रकरणी चौकशी समितीने 24 तासात अहवाल मागितला असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे यांनी स्पष्ट केले आहे.
महत्वाची बातमी ः पांढऱ्या कफन ऐवजी त्यांच्या नशिबी प्लॅस्टिकच... 'ते' भोगतायत मरणानंतरच्या मरणयातना; सायन रुग्णालय मधील विदारक वास्तव समोर....
मुंबई महापालिकेच्या सायन म्हणजेच लोकमान्य टिळक रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरू असलेल्या वॉर्डमध्येच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह प्लास्टिकमध्ये बांधून ठेवले होते. या मृतदेहांच्या बाजूलाच कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा त्या मृतदेहांच्या बाजूला रुग्णांचे नातेवाईक तसेच डॉक्टर, नर्स कर्मचारी फिरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हाच व्हिडिओ आमदार नितेश राणे यांनीही ट्विट करत पालिकेचे आणि रुग्णालय प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला.
24 तासांत अहवाल
याची गंभीर दखल घेत रुग्णालय प्रशासनाकडून चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समिती या व्हिडिओची सत्यता आणि वास्तविकता पडताळणार आहे. अवघ्या चोवीस तासात त्याचा अहवाल मागवण्यात आला असून चौकशीत आढळलेल्या दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
मोठी बातमी ः वरळी कोळीवाडा खरंच कोरोनामुक्त झालाय का?
कोविड मृतदेहांसाठी 'ही' नियमावली
राज्य शासनाने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार, कोविड-19 कक्षातील तसेच संशयित कोविड रुग्णांच्या कक्षातील मृतदेह, मृत्युनंतर 30 मिनिटांमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याविषयी संबंधितांना निर्देश देण्यात आले होते. परंतु अनेकवेळा रुग्णाचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यास उपलब्ध नसतात. तसेच सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून मृतदेह शवागारात पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात येतो. असे असले तरी अशाप्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत म्हणून रुग्णालय प्रशासन सर्वप्रकारची काळजी घेत आहे, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सक्त निर्देश देण्यात येत असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता इंगळे यांनी सांगितले आहे.
रुग्णालय कटिबद्ध
कोविड 19 विषाणू विरुद्धच्या लढाईत आरोग्य यंत्रणा पूर्णपणे झोकून देऊन काम करत आहे. बाधितांना तसेच सर्वसामान्य मुंबईकरांना योग्य ती आरोग्यसेवा मिळावी म्हणून महानगरपालिका प्रशासन वचनबद्ध आहे. अशा घटनांमुळे तसेच विविध अडचणीमुळे विचलित न होता यापुढेही खंबीरपणे आरोग्य यंत्रणा काम करीत राहील. आपणा सर्वांकडून सहकार्याची अपेक्षा आहे, असे इंगळे यांनी म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.