estilo furniture in pune best quality Interior designers in Mumbai Architectures sakal
मुंबई

Estilo Furniture : इस्टिलो फर्निचर - प्रत्येक ग्राहकाची पहिली पसंती...

आपलं घर आणि ऑफिस सजवण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला इस्टिलो फर्निचर हा एक उत्तम पर्याय

सकाळ वृत्तसेवा

पुणे तिथे काय उणे..अशी म्हण सर्वप्रचलित आहे. आज अशी कोणती गोष्ट आहे जी पुण्यात मिळत नाही.. हाकेच्या अंतरावर सर्व गोष्टी तुमच्या दिमतीला उभ्या दिसतात. तेव्हा नवीन वर्षात जर आपण आपलं घर आणि ऑफिस सजवण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला इस्टिलो फर्निचर हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो.

30 हजार स्क्वेअर फूट जागेत विस्तारलेल्या या प्रशस्त शोरुम मध्ये तुमच्या मनासारखं फर्निचर दिमतीला उभं दिसेल. उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचर्सनी सज्ज असलेलं हे शो रुम पुणे मुबंईतील इंटिरिअर डिझायनर्स, आर्किटेक्चर्स मोठ्या बिझनेसमन पासून थेट सेलिब्रिटींपर्यंत साऱ्यांची पहिली पसंती आहे. 

 आता आम्ही वाट पाहतोय तुमच्या सारख्या ग्राहकांची ज्यांना नेहमी सगळं बेस्ट हवं असतं. आम्हाला माहिती आहे तुम्ही क्वालिटीच्या बाबतीत तडजोड करणार नाही, आम्हाला माहिती आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट युनिक हवी आहे, आम्हाला माहिती आहे विश्वासार्हता जपलेल्या माणसांशी तुम्हाला नातं जोडायला आवडेल.. तेव्हा इस्टिलो फर्निचर तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे, एकदा नक्की भेट द्या.

आमच्या शो रुममध्ये आल्यावर भारतीय पद्धतीच्या हॅन्डीक्राफ्ट फर्निचर्सचे एकापेक्षा एक उत्कृष्ट पर्याय नजरेस पडतीलच शिवाय भारतात तुम्हाला फार कमी ठिकाणी पहायला मिळेल असे जगभरातील फर्निचर्सचे उत्तमोत्तम पर्याय इथे तुमच्या नजरेत भरतील. अर्थात एकाच छताखाली वेगवेगळ्या शेकडो व्हरायटीचं फर्निचर पहायला मिळणं ही सुवर्णसंधी आपल्यासारखे जाणकार नक्कीच मिस करणार नाहीत.

आज ट्रेन्डिंगचा जमाना आहे. जे चालतं त्यालाच प्रत्येकाची पहिली पसंती असते. आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये येणाऱ्याला जे दिसेल ते हटके आणि क्लासीकच असलं पाहिजे असा आपला हट्ट देखील असतो. ग्राहकांच्या याच मागणीला आम्ही अचूक हेरलं आणि मग डिमांड तसा सप्लाय या उक्तीनुसार ज्या ग्राहकाला जसं हवंय तसं फर्निचर उपलब्ध होईल याचा ध्यास घेतला.

टर्किश फर्निचरला जगभरात अधिक मागणी आहे... त्याच्यावरची कलाकुसर नेहमीच आपल्याला भावते. पण अनेकदा प्रश्न असतो आपल्याला हवं तसंच मिळेल का? तर आता यावर ‘हो’ असं ठाम उत्तर इस्टिलो फर्निचरकडे आहे.

इथे उत्तम इंटिरिअर डिझायनर सह २५ जणांची निष्णात टीमही कार्यरत आहे, जे तुम्हाला फर्निचर निवडताना योग्य मार्गदर्शन करतील. तुमच्या मनातील अनेक प्रश्नांना त्यांच्याकडे पटेल असंच उत्तर असेल. त्यामुळे खरेदी करताना तुमच्या मनात संभ्रम कमी, उत्साह अधिक असणार ही आमची गॅरंटी. 

आता इस्टिलो मधनं खरेदी केलं की आपला संबंध संपला असं होत नाही बरं का. खरेदीनंतर पुढील एक वर्ष जर आपल्याला फर्निचर संबंधित काही सहकार्य लागलं तर ती सर्व्हिस देखील आम्ही देतो.आणि याच आमच्या सेवेला हेरुन ‘पुणे टाईम्स मिरर’ ग्रुप तर्फे आम्हाला मानाचा ‘एक्सलन्स इन लक्झरी फर्निचर’ हा पुरस्कार मिळाला आहे. इस्टिलो फर्निचरला उद्योगजगतातील आपल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र लीडरशीप अॅवॉर्ड- 2022’ प्रदान करण्यात आला आहे.

आपण जेव्हा फर्निचर खरेदीसाठी जातो तेव्हा कदाचित ऑनलाईनही अनेक गोष्टी सर्च करतो. आजच्या काळात हे खूप मोठ्या प्रमाणावर होतं. ग्राहक अनेक गोष्टींचा अभ्यास करुन खरेदीसाठी बाहेर पडतो. अर्थात त्यामुळे डोक्यात खूप सगळ्या गोष्टींची गर्दी असते. मग मनात अनेकदा येतं..

आता गूगलवर पाहिलंय पण प्रत्यक्षात मिळेल का? किंवा ऑनलाईन फार काही खास नाही वाटलं.. आता प्रत्यक्षात तरी वेगळं काही नजरेत भरेल का? तर याचं उत्तर देखील इस्टिलो फर्निचरकडे आहे. इथे शॉपमध्ये आल्यावर तुम्हाला फक्त खूर्चीचेच १५० हून अधिक प्रकार पहायला मिळतील तर डायनिंग टेबलमध्ये तब्बल २०० प्रकार तुम्हाला चॉइसेस देतील. कॉफी टेबल असो की कॉर्नर टेबल, स्टायलिश सोफा सेट असो की कम्फर्टेबल बेड यामध्ये व्हरायटी पाहता पाहता तुम्हाला मोह आवरणार नाही.

आता थोडं इस्टिलो फर्निचर्स मध्ये उपलब्ध असणाऱ्या फर्निचरविषयी जाणून घेऊया. इथल्या फर्निचरची एक खासियत म्हणजे कम्फर्ट, लक्झरी, क्लासी, एलिगंट, ट्रेन्डिंग, हटके हे शब्द फक्त नावापुरते या फर्निचर्ससाठी वापरलेले नाहीत.. तर यांचा खराखुरा आनंद तुम्हाला आमच्या या फर्निचर्समधून अनुभवता येईल. आमचं फर्निचर हे स्पेस फ्रेंडली देखील आहे बरं का. कारण घर आणि ऑफिसमधील प्रत्येक कोपऱ्याचा विचार करुन त्यापद्धतीनं हे फर्निचर्स डिझान केलेले आहेत.

त्यामुळे ते नक्कीच बोजड वाटणार नाहीत तर ते तुमच्या घराला घरपण देतील अन् ऑफिसला लक्झुरीयस लूक. अर्थात जर आम्ही म्हटलं की तुमच्या ऑफिसमध्ये इस्टिलो फर्निचर्स असेल तर कामाचा उत्साह दुप्पट होईल तर अतिश्योक्ती नक्कीच ठरणार नाही. फर्नीचर्ससाठी वापरल्या जाणाऱ्या गोष्टीत आम्ही कुठेच तडजोड करत नाही. त्यामुळे फक्त दिखाऊपणा नाही, तर टिकाऊपणा हा देखील आमचा प्लसपॉइंट आहे, हे लक्षात ठेवा.

 आपल्या पुणेकरांसाठी, त्यांचे सख्खे शेजारी असलेल्या मुंबईकरांसाठी इस्टिलो फर्निचर्स उभारण्याचा ध्यास घेतला होता तो पियुष कारिया आणि त्यांच्या सोबत विकास बोंबले, सचिन बोंबले तसंच आकाश कुटे या वेगळा विचार करणाऱ्या, आधुनिक जगासोबत पुढे जाऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांनी. भारतीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं फर्निचर आपल्या शो रुममध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करत या उद्योजकांनी फर्निचर इंडस्ट्रीत मोठं नाव कमावलं आहे. आज त्यांच्या नावावर.. त्यांनी ग्राहकांना दिलेल्या विश्वासावर इस्टिलो फर्निचरकडे ग्राहक येतात. आणि ग्राहकांच्या याच विश्वासार्हतेनं इस्टिलो फर्निचरला अनेक पुरस्कारांचे मानकरी देखील ठरवलं आहे.

आणि आम्हाला खात्री आहे आमच्या ग्राहकांमुळेच आम्ही नवीन वर्षात देखील पुरस्काराचे मानकरी ठरू... तेव्हा आपल्या स्वप्नातलं घर आणि ऑफिस साकारण्यासाठी आजच इस्टिलो फर्निचरला भेट द्या.

Features

·        High Quality Products

·        Trusted Furniture Partner

·        Grand Showroom Spread Across 30,000 Sqft

·        Free Installation

·        22+ Years of Experience

Sr No. 29/8/1, Near Rangla Punjab Hotel, Mumbai-Bangalore Highway,

Pashan, Tal. Haveli, Dist. Pune 411 021. E: estilofurniture09@gmail.com

W: www.estilofurniture.in

Visit our showroom now! +91 8898 443 443

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT