मुंबई

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप ! गृहमंत्री अनिल देशमुखांवर परमबीर सिंह यांचे वसुलीचे आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप आणणारी बातमी मोठी बातमी आज पुन्हा एकदा समोर येतेय. प्रकरण आहे सचिन वाझे आणि परमबीर सिंग तसेच महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी निगडित.

सचिन वाझे हे API दर्जाचे पोलिस अधिकारी आहेत हे एव्हाना आपल्या सर्वांना समजलंय. अँटिलीया बॉम्ब प्रकरणी आणि मनसुख हिरेन प्रकरणी NIA मार्फत सचिन वाझे यांची चौकशीही होतेय. अशात मुंबईचे आयुक्त परमबीर सिंह यांना प्रकरण चांगलंच भोवले आणि आणि परमबीर सिंह यांनाही आपलं पद सोडावं लागलं. दरम्यान परमबीर सिंह यांच्या कार्यालयाकडून काही गंभीर चुका घडल्या त्यामुळे त्यांना पॅड सोडावं लागलं असं स्वतः गृहमंत्र्यांनी एका मुलाखतीत म्हंटले आहे. 

या पार्श्वभूमीवर परमबीर सिंह यांनी आज एक पत्र महाराष्ट्राचे मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. ज्यामध्ये परमबीर सिंह यांनी थेट महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर टोकाचे आरोप केले आहेत. खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये वसुली करायचे टार्गेट दिलं होतं, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. 

गृहमंत्र्यांची नुकतीच एक मुलाखत पार पडली. या मुलाखतीत अनिल देशमुख यांनी माध्यमांना चुकीची माहिती दिली असल्याचा आरोपही परमबीर सिंह यांनी पत्रात म्हटलंय. या प्रकरणात माझी पारदर्शक चौकशी केली जावी असंही परमबीरसिंह यांनी म्हंटले आहे. आम्ही ATS आणि NIA या  दोन्ही तपास यंत्रणांना तपासात हवे ते सहकार्य केलं आहे. मात्र गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांना माहिती देताना परमबीर सिंह यांच्या कार्यालयाकडून चुका झाल्यात आणि त्या अक्षम्य होत्या असं सांगितलं. 

परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रात पुढे नमूद केलं आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना त्यांच्या बंगल्यावर बोलावून घेऊन मुंबईतील बार आणि रेस्टॉरंट्समधून महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितलं होतं. मुंबईत साधारण १७५० बार्स आणि रेस्टॉरंट्स आहेत. त्यामुळे प्रत्येकी २ ते ३ लाख वसूल केलेत तरी महिन्याकाठी ४० ते ५० कोटींचे टार्गेट सहज शक्य असल्याचं अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना सांगितलं असल्याचं या पत्रात म्हंटल आहे.  यानंतर वाझे माझ्याकडे आलेत आणि त्यांनी मला सदर प्रकार सांगितला. सदर प्रकार ऐकून मी देखील शॉक झालो असं देखील या पत्रात नमूद करण्यात आलेले आहे.  

दरम्यान, या प्रकरणी आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
ex commissioner param bir singh writes letter to cm uddhav thackeray and targets HM anil deshmukh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ?

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT