मुंबई - महाविकास आघाडीविरोधात आणि महाविकास आघाडीने केलेल्या शेतकरी कर्जमाफीविरोधात भाजपकडून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात धरणं आंदोलन करण्यात येतंय. भाजपचे लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रभरात तहसीलदार ऑफिससमोर कर्जमाफीविरोधात आंदोलन करतायत. तर मुंबईत आझाद मैदानावर भाजपकडून मोठं धरणं आंदोलन करण्यात येतंय. या धरणं आंदोलनात भाजपच्या सर्व बड्या नेत्यांनी हजेरी लावलीये. यामध्ये सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आशिष शेलार हे सर्व नेते उपस्थित होते. यावेळी सर्व बड्या नेत्यांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
यावेळी बोलताना महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर घणाघाती टीका केलीये. महाविकास आघाडीचं सरकार निष्क्रिय असल्याचं त्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीकडून करण्यात आलेली कर्जमाफी फसवी असल्याचं मुनगंटीवार म्हणालेत. 'अब की बार बाप-बेटे की सरकार' या वाक्यांचा वापर देखील सुधीर मुनगंटीवार यांनी केला. याचसोबत सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकार हे स्थगिती सरकार असल्याचं म्हटलंय. भाजप सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांना चौकशीसाठी सातत्याने स्थगिती दिली जातेय. अशात कितीही वेळा चौकशी केली तरी काहीही सापडणार नाही असं देखील मुनगंटीवार म्हणालेत.
महाराष्ट्रातील महिला आणि भगिनींच्या सुरक्षिततेबद्दल देखील मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. महिलांवर अत्याचार करणारे नराधम मोकाट कसे? असा सवाल देखील मुनगंटीवारांनी उपस्थित केलाय. आझाद मैदानातील व्यासपीठावरून भाजपच्या सर्वच बड्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.
ex finance minister sudhir mungantiwar targets maha vikas aaghadi govt over farmers loan wavier
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.