Ramesh-Kadam sakal
मुंबई

Ramesh Kadam : माजी आमदार रमेश कदमांची तुरुंगातून सुटका; कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत

अण्णा भाऊ साठी महामंडळ घोटाळ्याप्रकरणी 8 वर्षांनंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अण्णा भाऊ साठी महामंडळ घोटाळ्याप्रकरणी 8 वर्षांनंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम यांची ठाणे मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. न्यायलयाने रमेश कदम यांना जामिन मंजूर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार अटकेत होते. तब्बल 8 वर्षांनंतर त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

प्रकरण थोडक्यात

अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील कथित 312 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम हे तुरुंगात होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे रमेश कदम हे अध्यक्ष होते.

त्या कालावधीत त्यांनी अनेक बनावट लाभार्थी दाखवून शेकडो कोटींचा गैरव्यवहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या गैरव्यवहारप्रकरणी कदम यांना आठ वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. या गैरव्यवहाराबाबत माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी कदम यांच्यावर थेट आरोप केला होता. अण्णाभाऊ साठे महामंडळात 250 कोटींचा गैरव्यवहार झाला असून त्याचे 3700 पानी पुरावे आपण लाचलुचपतसह सर्व विभागांना दिले आहेत.

कार्यकर्त्यांकडून स्वागत

रमेश कदम यांच्यास्वागतासाठी कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच ठाणे मध्यवर्ती कारागृहाबाहेर मोठी गर्दी केली होती. सुटकेनंतर त्यांचे कार्यकर्त्यांकडून ढोल-ताशाच्या गजरात आणि घोषणा देत त्यांचं जंगी स्वागत केलं. मुंबई, ठाणे, सोलापूरमधून अनेक कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी पोहचले होते. रमेश कदम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार होते. त्यांनी 2014 आणि 2019 साली तुरुंगात असताना अपक्ष उमेदवार म्हणून सोलापूर मोहोळ या मतदार संघातून लढवली होती.

आरोप फेटाळले

माझ्यावर जे आरोप झाले त्यांना मी समोरा गेलो. न्यायालयाने माझ्यावर झालेल्या आरोपांचा विचार करून मला जामीन दिला. त्याबद्दल उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयाचे आभार मानतो. माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत आणि आण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून वाटलेला पैसा कर्ज रुपात वाटण्यात आला आहे. ते कर्ज असून भ्रष्टाचार झाला नसल्याची प्रतिक्रिया जामीनावर सुटका झाल्यानंतर रमेश कदम यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Maharashtra Election 2024 : उल्हासनगर परिमंडळातील 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत 24 ड्रोनचा वॉच, मतदान प्रक्रियेसाठी कंबर कसली

Leopard Attack : चिमुकल्याच्या मृत्यूमुळे आई-वडिलांचा टाहो; एका महिन्यात तीन बळी

Sanapwadi Village Voting : स्वातंत्र्याच्या सत्त्याहत्तर वर्षानंतर प्रथमच सानपवाडीकर करणार स्वतःच्या गावांत विधानसभेसाठी मतदान

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

SCROLL FOR NEXT