मुंबई

लॉकडाऊनमुळे मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम; वाचा बातमी

सकाळ वृत्तसेवा


मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून असलेल्या लॉकडाऊन काळात लोक आपला वेळ घालवण्यासाठी मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपवर सर्वाधिक वेळ घालवत आहेत. त्यामुळे सध्या लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच डोळ्यांच्या समस्या जाणवत आहेत. डोळे चुरचुरणे, झोप अपूर्ण होणे, डोके दुखणे, मोबाईलचा वापर बंद केल्यावर अंधुक दिसणे अशा समस्यांनी लॉकडाऊनमध्ये डोकेवर काढले आहे.

लॉकडाऊनमुळे नागरिकांची जीवनशैली पूर्णतः बदलून गेली आहे. वर्क फ्रॉम होममुळे लोकांना 12 तासांहून अधिक लॅपटॉपचा वापर करावा लागला आहे. जो पूर्वी 8 ते 9 तास होता. तसेच वेळ घालवण्यासाठी सर्व मोबाईल सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर वेळ घालवतात. या सर्वांमुळे डोळ्यांवर प्रचंड ताण पडत आहे. आरोग्यासाठी एवढा ताण घातक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

ऑनलाईन शिक्षणासाठी मुले आठ तास स्क्रीनसमोर! 
मुलांचा ऑनलाईनवरील वेळ वाढत असल्याने त्यांच्या अगोदरच्या चष्माचा नंबर वाढण्याची भीती आहे. तर मुलांचे ऑनलाईन क्लासेस तसेच ऑनलाईन शाळा सुरू झाल्यामुळे सकाळी चार ते पाच तास शाळांचे व त्यानंतर पुन्हा चार तास शिकवणीचे असे तब्बल 8-9 तास मुले लॅपटॉप, मोबाईल, टॅबवरील स्क्रीनसमोर वेळ घालवत आहेत.

सध्या लोक दिवसभर समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह आहेत. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर जास्त ताण येतो. डोळे दुखतात, थकवा जाणवतो, लांबचे दिसत नाही अशा प्रकारच्या अनेक तक्रारी येत आहेत. पण तक्रारादारांना हा त्रास मोबाईलच्या अतिवापरामुळे होतो याची जाणीव नसते. मोबाईलचा अतिवापर टाळणे हाच यावरील सर्वोत्तम उपाय आहे.
- डॉ. रागिनी पारेख, नेत्रतज्ज्ञ, जे. जे. रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयी उमेदवाराचे औक्षण करताना रसायनयुक्त गुलालामुळे उडाला भडका; सहा ते सात कार्यकर्ते भाजले, नेमकं काय घडलं?

Mahayuti Strike Rate: महायुतीचा जबरदस्त स्ट्राइक रेट! काय ठरले निर्णायक? विरोधकांचं झालं पानीपत

IND vs AUS 1st Test : नाद करा, पण Yashasvi Jaiswal चा कुठं? ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुतले; गावस्कर, तेंडुलकर, कांबळी यांच्याशी बरोबरी

Latest Maharashtra News Updates : राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी आज संध्याकाळी राज्यपालांची घेणार भेट

खोट्या अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध ए आर रहमानने जारी केली कायदेशीर नोटीस ; "या अफवेमुळे माझ्या कुटूंबाला त्रास..."

SCROLL FOR NEXT