Child Protein Diet sakal
मुंबई

Child Protein Diet : बालरोगतज्ज्ज्ञ म्हणतात... प्रथिनयुक्त आहार बालकांना ठेवेल निरोगी      

भाग्यश्री भुवड

मुंबई : आजही मुंबईसारख्या प्रमुख शहरात तीव्र कुपोषित बालके आढळून येतात. योग्य आहार न घेतल्याने मातेपासून बालकाला रक्ताची कमतरता होते. तीव्र कुपोषित मुलांमध्ये ॲनेमिया झाल्याने इतर संसर्ग लगेच होतात. कधीकधी ह्रदय निकामी झाल्याच्या लक्षणांनीही मुल रुग्णालयात दाखल होते.

पालक जेव्हा त्या बाळाला बालरोगतज्ज्ज्ञांना दाखवतात तेव्हा बाळाला कुपोषण असल्याचा निष्कर्ष काढला जातो. मात्र, चांगल्या प्रथिनयुक्त आहाराने बालकांना निरोगी आणि कुपोषणमुक्त ठेवता येऊ शकते.

सायन रुग्णालयाअंतर्गत येणाऱ्या धारावी येथील एकनाथराव गायकवाड एनआरसी म्हणजे न्यूट्रिशन रिहॅबिलिटेशन रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटरमध्ये वर्षाला ५०० तीव्र कुपोषित मुलांची नोंद होते. तर, ३००० मुलांचे स्क्रिनिंग केले जाते. यातील अनेक मुले इतर रुग्णालयांमधून किंवा संस्थामार्फत  रेफर केलेले असतात. ज्या मुलांना तीव्र कुपोषण असते, त्यांना  रुग्णालयात दाखल करुन उपचारांची गरज भासते. कारण, त्यांच्यात इतर अडथळे निर्माण होतात.

दरवर्षी ५०० मुलांना प्रथिनयुक्त पेस्ट -

छोटा सायन रुग्णालयात दरवर्षी ५०० तीव्र कुपोषित मुलांना एमएनटी म्हणजे मेडिकल न्यूट्रिशन थेरेपी ( ही रेडी टू यूज प्रथिनयुक्त पेस्ट) मोफत दिली जाते. जी शेंगदाणे, तेल, दूधाची पावडर आणि मल्टिव्हिटामिन्स यापासून तयार केली जाते.

६ महिन्यांवरील बालकांच्या आजाराच्या तीव्रतेवर त्यांना या पेस्टचे डब्बे दिले जातात. काही मुलांना दाखल करुन किमान १४ दिवस डब्बे दिले जातात. मुलाला सवय लागली की ते डब्बे घरी दिले जातात.

त्यानंतर मुलांची वाढ, जेवणाची पद्धत आणि उंची तपासली जाते. भारतीय मानांकनानुसार मुलांच्या उंची आणि वाढीवरुन मुलांच्या पोषणाच्या गरजा ओळखल्या जातात. कुषोषणातही वेगवेगळे प्रकार असतात. कमी वजन, तीव्र सडपातळ, सौम्य कुपोषित, तीव्र कुपोषित, मध्यम कुपोषित अशी मुलांची नोंद केली जाते.  

दरवर्षी राष्ट्रीय पोषण महिना १ ते ३० सप्टेंबर दरम्यान साजरा केला जातो. यावर्षी सातवा राष्ट्रीय पोषण महिना साजरा होत आहे. यंदाच्या राष्ट्रीय पोषण महिन्यात ॲनेमिया- रक्ताची कमतरतात ( अशक्तपणावर ) विशेष लक्ष दिले जात आहे. भारतातील समाजातील प्रत्येक वर्गात, विशेषत: महिला आणि मुलांमध्ये ॲनिमिया आढळतो.

ॲनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता. आणि प्रत्येक महिलेत ही कमतरता असल्याने भविष्यात मुलांना ही याचे दुष्परिणाम होतात. यालाच गांभिर्याने घेऊन छोटा सायन रुग्णालयात कमी वजन असलेल्या, तीव्र कुपोषित असलेल्या बालकांच्या पालकांना शुक्रवारी (२०) पोषक आहारासंबंधी माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आले.

या केंद्रात २०११ पासून एमएनटी पेस्टचा उपक्रम राबवला जात आहे. आतापर्यंत १२ ते १३ हजार मुलांना या पेस्टचा फायदा झाल्याचे धारावी एनआरसीसी केंद्राचे इंन्चार्ज आणि सायन रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ विभागाचे अतिरिक्त प्राध्यापक डाॅ. यशवंत गभाले यांनी सांगितले.

डॉ. गभाले म्हणाले मुलांच्या वयोगट आणि वजनानुसार एमएनटी पेस्ट दिली जाते. दिवसाला किमान एक पेस्टचा डब्बा बालकाच्या आहारात असलाच पाहिजे. ९० ग्रॅमच्या एक डब्ब्याच्या पेस्टमध्ये ५४० किलो कॅलरीज असतात. तर, १५ ग्रॅम प्रथिने असतात. या पेस्टमधून मुलाच्या दिवसभराची पोषणाची मात्रा भरुन निघते.

मध्यम कुपोषित मुलांना तीव्र होण्यापासून वाचवणार -

रुग्णालयाने आता मध्यम कुपोषित या गटात असणाऱ्या मुलांना शोधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार, त्यांची तीव्रता वाढणार नाही. आणि दुसरे म्हणजे कुटुंंबाचे स्क्रिनिंग. म्हणजे जिथे एक मुल कुपोषित आढळलं असेल त्या कुटुंबातील इतर मुलांचे स्क्रिनिंग करणे.

म्हणजे ते भविष्यात कुपोषित होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी हे दोन प्रकल्प राबवले जात आहेत. चांगल्या आहाराने बाळ कुपोषणापासून वाचेल. बाळाच्या ६ महिन्यांपर्यंत मातेचे दूध हे बाळासाठी अमृत असते.

डॉ. राधा घिलडियाल, प्रमख, बालरोग विशेष विभाग, सायन रुग्णालय  

फॉलोअप महत्त्वाचा-

तीव्र कुपोषित बालकाच्या पालकांना समुपदेशनाची गरज भासते. फॉलोअपसाठी कॉल्स केले जातात. पालक स्थलांतरीत झाल्यानंतर मुलांचे उपचार अर्धवट राहतात. याचे प्रमाण अंदाजे २० टक्के असेल. इतर गंभीर अडथळे निर्माण होऊन मुलांचा मृत्यू देखील होतो. महाराष्ट्रासह इतर ठिकाणांहून मुले उपचारांसाठी येतात.

-रुही कुरेशी, आहारतज्ज्ञ, छोटा सायन

आहारतज्ज्ञ माहीनूर पिरजादा यांनी सांगितले की, मुलांना चवीचे आणि चमचमीत पदार्थ खायला आवडतात. त्यामुळे, घरच्या भाज्यांपासून, पिठांपासून वेगवेगळ्या पदार्थांचा कुकिंग डेमो आम्ही पालकांना देतो. ज्याचा फायदा त्यांना आणि बालकांना होतो.

काय खाऊ नये? -  काय खावे?

फ्रुटी ज्यूस-        पुर्ण फळ (दोन केळे,  दोन संत्र, दोन पेरु , चिकू )

बटाटा चिप्स -     अख्खा शेंगदाणा

कुरकरे-              अंडा

बिस्किट-             चणे

चॉकलेट -        चिक्की लाडू, राजगिरा लाडू

बेकरी फूड -    चणे, दूध, मासे, चिकन, पनीर, डाळी, हिरव्या भाज्या, सुका मेवा,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharavi: धारावी मशीद प्रकरण; दंगल भडकवणाऱ्या पोस्ट व्हायरल, तिघांना अटक, पोलिसांची मोठी कारवाई

Maratha Reservation : मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे आश्वासन… बैठकीत नेमकी काय झाली चर्चा?

Latest Maharashtra News Live Updates: पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये दाखल होण्यापूर्वी भारतीयांकडून ढोल-ताशांचा गजर

मयंक अगरवालच्या भारत अ संघाने जिंकली Duleep Trophy; रोमांचक सामन्यात सुदर्शनच्या शतकानंतरही ऋतुराजच्या संघाचा पराभव

Kiran Mane : तिकळी मालिका सोडून किरण मानेंची कलर्स मराठीवर एंट्री ; या मालिकेत करणार काम

SCROLL FOR NEXT