मुंबई - मुंबईत येत्या महिनाभरात कोरोना रूग्णांमध्ये हजारोंनी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात असून मुंबईसाठी मे महिना हा धोक्याची घंटा असणार आहे. राज्य सरकारने वैद्यकीय तज्ज्ञांनी दिलेला हा इशारा गंभीरपणे घेतला असू्न मोठ्या संख्येने वाढणाऱ्या कोरोनांच्या रुग्णांना उपचार देण्यासाठी वैद्यकीय यंत्रणेची व्याप्ती वाढविण्यास सुरुवात केली आहे. अनेक सरकारी आणि खासगी रूग्णालयेही केवळ कोरोनावर उपचार करण्यासाठी ताब्यात घेण्याबाबत राज्य सरकार चाचपणी करत आहे.
मुंबई - पुणे वगळता राज्यात कोरोनाच्या रूग्णांची प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवणे राज्य सरकारला शक्य झाले आहे; मात्र मुंबईतील कोरोना नियंत्रणात आणण्याचे आव्हान आहे. त्यातच मे महिन्यात मुंबईतील परिस्थिती अधिक गंभीर बनणार असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. मुंबईत कोरोनाने झालेले मृत्यू, दाट लोकवस्ती, झोपडपट्टयांचे प्रमाण, वयोगट आणि आतापर्यंत कोरोना रूग्णांचा आलेख याचा अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार मुंबईसाठी संपूर्ण मे महिना चिंतेत वाढ करणारा असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
यानुसार मे महिन्यामध्ये विशेषतः मुंबईत रूग्णांची संख्या हजारोंनी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, इतक्या संख्येने वाढणाऱ्या रूग्णांना उपचार देण्यासाठी अगदी काही दिवसांमध्ये यंत्रणा उभी करण्याचे आव्हान राज्य सरकारसमोर आहे.
केंद्रीय पथकापुढे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा काढला 'हा' महत्त्वाचा विषय; मोदी देणार का परवानगी ?
... तरच रुग्णाला वाचवता येईल
दाट वस्त्यांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे. कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्यांची चाचणी होऊन त्यांना उपचार मिळण्यासाठी सध्या सात ते आठ दिवसांचा कालावधी लागत आहे. तो कालावधी दोन ते तीन दिवसांच्या आत असेल तर रुग्ण वाचवता येवू शकणार आहेत. अद्यापही काही रूग्ण स्वतःहून औषधे घेत आहे आणि परिस्थिती गंभीर झाल्यानंतर सात-आठ दिवसांनी रूग्णालयात दाखल होत असल्याने कोरोनाच्या रूग्णांचा मृत्यूदर वाढला असल्याचेही विश्लेषण या अहवालात करण्यात आले आहे.
exponential growth in covid 19 patients expected in the month of may says health experts
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.