मुंबई: लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाचा वापर मोठया प्रमाणात केला जात आहे. तसंच या काळात त्याच प्रमाणही वाढलं आहे. मात्र जशी यूजर्सची संख्या वाढली आहे तशीच सायबर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आपली माहिती चोरीला जाईल की काय अशी भीती निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर फेसबूकनं एक विशेष फिचर लाँच केलं आहे.
भारतामध्ये फेसबुकनं नवीन सुरक्षा फिचर आणलं आहे. ज्यामुळे तुम्ही तुमची प्रोफाइल आता लॉक करू शकणार आहात. यामुळे फेसबुकवर तुमच्याशिवाय तुमची प्रोफाइल कोणीही बघू शकणार नाही किंवा तुमच्या मित्रांनाच तुमची प्रोफाइल दिसू शकेल. फेसबुकनं हे फिचर भारतातल्या लोकांसाठी खास करून महिलांच्या सुरक्षेसाठी लाँच केलं असल्याचं समजतंय.
"लोकांना स्वतःला प्रदर्शित करत असताना सुरक्षित प्लॅटफॉर्म देण्यासाठी आम्ही वचनबद्ध असून भारतीय लोकांसाठी खास करून महिलांच्या त्यांचे ऑनलाईन प्रोफाइल सुरक्षित करण्याच्या चिंतेबद्दल जागरूक आहोत. आज, फेसबुकनं नवीन फिचर लाँच केलं आहे. जे केवळ एकाच टप्प्याचं आहे, ज्यामुळे लोकांना आपल्या प्रोफाईलवर मोठया प्रमाणात नियंत्रण ठेवता येईल आणि त्यांची ऑनलाईन सुरक्षेची खात्री होईल," असं फेसबूक इंडियाचे पब्लिक पॉलिसी डायरेक्टर अखि दास यांनी म्हटलंय.
फेसबूक प्रोफाईल लॉक करून तुम्ही विविध प्रायव्हसी सेटींग करू शकणार आहात. एका सोप्या पद्धतीनं तुमच्या फेसबूक प्रोफाईलला हे नवीन फिचर अप्लाय करता येणं शक्य होणार आहे. तुम्ही तुमची प्रोफाइल लॉक केल्यावर तुमचे फ्रेंड लिस्टमध्ये नसलेल्या लोकांना काही गोष्टी दिसणार नाहीत. तसंच तुमचं प्रोफाइल फोटो किंवा कव्हर फोटो झूम, शेयर किंवा डाऊनलोडही करू शकणार नाहीत. या फिचरमुळे तुमच्या अकाऊंटमधील (जुने आणि नवीन दोन्ही ) फोटो बघता येणार नाहीत.
फेसबुकनं या नवीन फिचरचं इंडिकेटर तुमच्या प्रोफाइल पेजला असेल. ज्यामुळे तुम्हाला प्रोफाइल लॉक करण्याची आठवण राहील.
“आम्ही युवतींकडून नेहमीच असे ऐकतो की त्यांना फेसबुक काही ऑनलाईन शेयर करण्यासाठी त्रास उद्भवतो आणि कोणीतरी त्यांच्या माहितीचा गैरवापर करेल अशी त्यांना नेहमीच भीती वाटते. महिलांच्या या समस्येवर फेसबुकनं अभ्यास केला असून अजूनही त्यावर काम सुरु आहे. तसंच महिलांना त्यांना हवा तसा आणि चांगला अनुभव देण्यासाठी फेसबुक नवनवीन प्रोडक्ट तयार करत आहे. या नवीन सुरक्षित फिचरमध्ये, महिलांना खास करून मुलींना हवं तसं काही तर मुक्तपणे शेअर करता येईल,” असं सेंटर फॉर सोशल रिसर्चच्या संचालिका रंजना कुमारी यांनी म्हटलंय.
हे फिचर 'ऑन' करण्यासाठी हे करा:
• तुमच्या नावाखाली More ला टॅप करा.
• Lock Profile टॅप करा.
• Lock Your Profile पुन्हा टॅप करा.
अशा पद्धतीनं तुम्ही तुमची फेसबुक प्रोफाइल लॉक करू शकणार आहात.
facebook launched special feature for security of profile read full story
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.