fade up BJP Shiv Sena controversy in Kalyan Lok Sabha Constituency politics Sakal
मुंबई

Lok Sabha Election : भाजप व गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असेल तर सहकार्य न करण्याची भूमिका कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांनी घेतली होती. यामुळे महायुतीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असेल तर सहकार्य न करण्याची भूमिका कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांनी घेतली होती. यामुळे महायुतीत तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.

अखेर या वादावर पडदा पडला असून भाजप आमदार गणपत गायकवाड समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात भाजप मधील वरिष्ठांना यश आले आहे. यामुळे खासदार शिंदे यांच्यापुढील अडचण काहीशी कमी झाल्याचे चित्र आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप व शिवसेना शिंदे गटात धुसफूस सुरू असून त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीवर उमटत आहेत. हा वाद इतका टोकाला गेला आहे की शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत शिंदे असतील तर त्यांना सहकार्य न करण्याची भूमिका कल्याण पूर्वेतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी घेतली.

दोन दिवसांपूर्वीच गायकवाड यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत याची चर्चा झाली होती. भाजप कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा केली तरी कार्यकर्त्यांना समज देण्याची मागणी शिवसेना गोटातून होत होती.

आज सकाळीच मंत्री चव्हाण यांच्या बंगल्यावर कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली. या बैठकीत मंत्री चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढल्याचे बोलले जात आहे. यानंतर कल्याण मध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी घेतली पत्रकार परिषद घेत या वादावर पडदा पडल्याचे स्पष्ट केले.

कल्याण लोकसभा मतदार संघ भाजपला मिळावा अशी कार्यकर्त्यांची मागणी होती ती गैर नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा केली त्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो.

गणपत गायकवाड यांनी देखील पक्षाची भूमिका मान्य केली असती. त्यांनी कार्यकर्त्याना हेच सांगितले आहे. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे, राज्यात 45 पार करायचं आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार श्रीकांत शिंदे यांना बहुमताने निवडून द्यायचे आहे.

गणपत गायकवाड यांच्या भूमिकेचं सर्व कार्यकर्त्यांनी समर्थन केलं असल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी बैठक घेतली आणि घोषणा केल्या त्याअर्थी ते गुंड होत नाही. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी करणे गैर नाही. भाजप व गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, ऐन प्रचारादरम्यान विमानतळावरच अडकून पडले!

School Nutrition : शालेय पोषण आहारातील चॉकलेट रस्त्यावर फेकले, निकृष्टता आणि अळ्यांच्या विरोधात कारवाई

Vikramgad Assembly Constituency 2024 : पतीच्या विजयासाठी आमदार पत्नी प्रचाराच्या मैदानात,आघाडीचे ऊमेदवार सुनिल भुसारांचे पारडे जड

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

SCROLL FOR NEXT