corona vaccination sakal
मुंबई

मुंबईत बोगस लसीकरणाचं रॅकेट सुरुच!

बोरिवलीत तब्बल 514 जणांनी घेतली लस

सुरज सावंत

मुंबई : बोगस कोरोना लसीकरणाच्या (corona Fake Vaccination) रॅकेटने मुंबईत धुमाकुळ घातला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बोगस लसीकरण करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. या रॅकेटचा पर्दाफाश होत असतानाच पुन्हा दोन ठिकाणी बोगस लसीकरण झाल्याचं समोर आलं आहे. (Fake corona Vaccination racket still happening in Mumbai FIR filed by Mumbai police)

कांदिवलीच्या गृहनिर्माण सोसायटीत बोगस लसीकरणाची घटना घडली होती. त्यानंतर टिप्स कंपनी आणि बोरिवलीच्या महाविद्यालयात (Borivali College) बोगस लसीकरण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ही घटना ताजी असतानाच बोगस लसीकरण प्रकरणी आणखी दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईतील बांगूरनगर पोलिस ठाण्यात सहावा गुन्हा तर बोरिवली पोलिस ठाण्यात (Borivali Police Station) सातव्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

बांगूरनगर पोलीस ठाण्यात एका बॅंकेने लसीकरण आयोजीत केले होते. यावेळी 30 जणांनी लस घेतली. तर बोरिवलीतील एका खासगी कंपनीत राबविण्यात आलेल्या बोगस लसीकरण मोहिमेत तब्बल 514 जणांनी ही लस घेतली असल्याने एकच खळबळ उडाळी आहे. या प्रकरणी मुंबई पोलिस अधिक तपास करीत आहेत. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या एका महिलेला मुंबई पोलिसांनी अटकेची कारवाई केल्याने महिलांचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे समोर आलं आहे. गुडीया यादव असं पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचं नाव आहे. गुडियाने नेस्को कोविड सेंटरच्या कोविन अॅपचा युजर आयडी आणि पासवर्ड चोरला होता. या नेस्को सेंटरच्या गोपनीय माहितीचा वापर आरोपी महिलेने गुन्हा करताना केला असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT