falling metal rod passed through young man body during the construction of the building in badlapur  
मुंबई

Mumbai News : बांधकाम सुरू असताना खाली पडलेला सळई तरूणाच्या शरीरातून आरपार; मग पुढे…

रोहित कणसे

मुंबई : बदलापू येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून पडलेली सळई खाली उभ्या असलेल्या एका तरुणाच्या शरीरात घुसून आरपार निघाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या तरुणावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बदलापूर (Badlapur) पूर्वेच्या पनवेलकर हायवे लगत ठाणेकर पॅलेसिओ नावाच्या गृहप्रकल्पाचं बांधकाम सुरू आहे. याच्या जवळच सुरू असलेल्या रिलायन्स मार्ट दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग करण्यासाठी सत्यप्रकाश तिवारी हा २६ वर्षीय कामगार काम करत होता.

हेही वाचा - शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

दरम्यान सुरू असलेल्या बांधकामातून एक सळई तरुणाच्या अंगावर पडली, ही सळई सत्यप्रकाश याच्या खांद्यात घुसली आणि पाठीतून आरपार बाहेर पडली. या प्रकारानंतर तातडीने गांधी चौकातील निर्मल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन तिवारी यांच्या पाठीत घुसलेली सळई काढली. शस्त्रक्रियेनंतर त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे. याबद्दलचे वृत्तं साम टीव्हीने दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT