Builder Mangesh Gaikar sakal
मुंबई

Dombivali News : कल्याणमधील प्रसिद्ध बिल्डरला गोळी लागली, बिल्डरसह त्यांचा मुलगा जखमी

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - कल्याण मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर आणि त्यांचा मुलगा गोळीबारात जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगेश गायकर यांच्या चिकन घर येथील कार्यालयात गुरुवारी घडली. दोघांनाही तातडीने कल्याणमधील मीरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मंगेश गायकर यांच्या संरक्षणासाठी दिलेली बंदूक साफ करत असताना चुकून गोळी सुटली, ज्यामुळे मंगेश आणि त्यांचा मुलगा जखमी झाले आहेत. गोळी अपघाताने चालली की कोणी इतरांनी गोळीबार केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मंगेश गायकर यांच्या कार्यालयात त्यांचे व्यावसायिक पार्टनर आणि इतर सहकारी एकत्र बसले होते. यावेळी बंदूक साफ करत असताना मंगेश यांच्या हातून गोळी सुटली. ती गोळी त्यांच्या हाताच्या आरपार गेली आणि त्यांच्या मुलालाही लागली. या घटनेनंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली आणि दोघांना मीरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन सखोल तपास सुरू केला आहे. सध्या गायकर यांना गोळी कशी लागली यावर संशोधन सुरू असून, यामध्ये मिस फायरिंग झाल्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे. तसंच पोलिसांनी रुग्णालयात चौकशी केली असून, या प्रकरणाचा तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Crime Against Dalits: गहू चोरल्याच्या आरोपावरून तीन दलित अल्पवयीन मुलांची काढली धिंड; आरोपींना अटक

IND vs AUS : इंडियाला धक्का; रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांना मुकणार, कारण...

Cabinet Meeting: नॉन क्रिमिलेयरची मर्यादा, पत्रकारांसाठी महामंडळ... मंत्रिमंडळ बैठकीत 38 मोठे निर्णय

Manoj Jarange Video: तुम्ही पिता का हो? जरांगेंना थेट प्रश्न, उत्तरही धमाकेदार; जरांगे पाटलांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत

SCROLL FOR NEXT