farmers aggressive at diva hospital land survey bmc marathi news Sakal
मुंबई

Mumbai News : दिव्यात होणाऱ्या रुग्णालयाच्या जागा मोजणी प्रसंगी आगासन शेतकरी आक्रमक

सकाळ वृत्तसेवा

- आरती मुळीक परब

दिवा : दिवा शहराची वाढत असलेली लोकसंख्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेकडून अगासन गावाजवळ रुग्णालय, पोलीस स्टेशन, बस स्टॅंड तसेच पालिकेचे कार्यालय, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

त्यासाठी पालिकेने ३४ एकरचा भूखंड निश्चित केला आहे. पालिकेतर्फे होणाऱ्या दिव्यातील शासकीय रुग्णालयासाठी साधारण सहा एकर जागा निश्चित करण्यात आली असून सदर जागेचे सर्वेक्षण व मोजणी करण्यासाठी मंगळवारी पालिकेचे अधिकारी आले असता त्यांना आगासन गावकऱ्यांनी आक्रमक होत विरोध दर्शविला.

पालिकेने निश्चित केलेल्या भूखंडाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे अधिकारी तसेच ठाणे पालिकेचे अधिकारी शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात दिवा शहराजवळील आगासन गावात दाखल झाले होते.

प्रसंगी शेतकऱ्यांनी आम्हाला विश्वासात न घेता तुम्ही रुग्णालयाचा सर्व्हे सुरू केल्याचा आरोप केला. यासाठी आम्हाला पालिके तर्फे शुक्रवारी नोटीसा दिल्या गेल्या अन् नंतर शनीवार, रविवार सुट्टीमुळे पालिका बंद होती.

त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा न करता व त्यांना विश्वासात न घेतल्यास आम्ही पुढे होणारे सर्वेक्षण करू देणार नाही, असे प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना गावकऱ्यांनी बजावले. गावकऱ्यांनी आक्रमक रूप धारण केल्यामुळे सदर भूखंडाचे सर्वेक्षण थोडा वेळ थांबवून नंतर पूर्ण करण्यात आले. त्यावेळी गावकऱ्यांनी हस्तक्षेप करून सर्वेक्षण व मोजणीचा डाव उधळून लावण्याचा प्रयत्न ही केला.

दिव्यातील आगासन भागात 1983 पासून रेल्वेचा १३.८७ हेक्टर हा प्लॉट राखीव ठेवला होता. तसेच भारतीय रेल्वे कल्याणकारी संघटनेसाठी राखीव असलेल्या १३.८७ हेक्टर अर्थात ३४.६७ एकर या इतक्या विस्तीर्ण भूखंडावर बसस्थानक, मार्केट, हॉस्पिटल, विभाग कार्यालय, अग्निशमन दल, पोलीस ठाणे,

जलकुंभ आणि वाहनतळ यासारख्या सार्वजनिक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यासंदर्भात आरक्षण बदलाचा प्रस्ताव ठाणे महापालिकेने १५ एप्रिल २०१७ रोजी राज्याच्या नगरविकास विभागास पाठवला होता. त्यासंदर्भात इत्थंभूत अभ्यास करून पुणे येथील राज्याच्या नगररचना संचालकांनी मान्यता दिल्यानंतर नगरविकास विभागाने ठाणे महापालिकेस या सार्वजनिक सुविधांचे जाळे उभारण्यास संमती दिली आहे.

दिव्यातील आगासन या १३.८७ हेक्टर जागेची विभागणी पुढीलप्रमाणे. पोलीस ठाणे १.५ हेक्टर, बसस्टॅण्ड ०.२५ हेक्टर, मार्केट ३.०१ हेक्टर, जलकुंभ १.०९ हेक्टर, विभाग कार्यालय २.४ हेक्टर, हॉस्पिटल २.४ हेक्टर, वाहनतळ ०.७५ हेक्टर, अग्निशमनतळ ०.७४ हेक्टर, १५ मीटर रोड १.६४ हेक्टर

रमाकांत मढवी, माजी उपमहापौर, ठाणे - 1983 ते 1992 साली झालेले रिझवेशन आहे. हे 1992 साली रिझवेशन महापालिकेने मंजूर करुन शासनाकडे पाठवले. हे इंडियन रेल्वे वर्कस ऑर्गनाजेशनसाठी ते राखीव होत. त्यानंतर अख्खा दिवा सीआर झेड डिक्लेअर झाला. दिवा ग्रीन झोन झाल्यामुळे कुठेही मुलभूत सोयींसाठी राखील प्लॉट नव्हते.

2017 साली ठाणे महानगरपालिकेने रेल्वेकडे असणारा तो प्लॉट दिवेकरांसाठी ताब्यात घेतला. त्यानंतर हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, वॉर्ड ऑफिस, शाळा, पाण्याची टाकीसाठी रिझवेशन केले. या जागेवरील शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला गेला पाहिजे या मताचा मी आहे. महापालिका TDR स्वरुपात मोबदला देते.

त्यावेळी शेतकरी TDR स्वरुपात मोबदला घेऊ इश्चित नव्हते. त्यामुळे आम्ही दिव्यातील नगरसेवक आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने एक ऐतिहासिक ठराव केला की हॉस्पिटलसाठी बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना TDR न देता रोख रक्कम द्यायची. हा ठराव शासनाने मंजूर ही केला. तसेच श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने 58 कोटी निधी पालिकेकडे वर्ग झाला.

रोहिदास मुंडे, अध्यक्ष, आगासन गाव बचाव संघर्ष समिती:- आगासन गावात टाकलेला आरक्षण अन्यायकारक आहे ठाणे महानगरपालिकेने जे आरक्षण संपूर्ण दिवा विभागात टाकले आहेत ते अगोदर हस्तांतरित करावे हे शेतकऱ्यांचे सरकार आहे की हुकूमशाहीचे सरकार आहे पोलीस बंदोबस्तात शेतकऱ्यांच्या जागेत जबरदस्तीने सर्वे करण्याचा मानस महापालिकेचा आहे याचा आम्ही निषेध करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Diwali Payment: लाडक्या बहिणींना दिवाळीपूर्वीच ॲडव्हान्समध्ये मिळणार दोन हफ्ते; अधिकाऱ्यांनी सांगितली तारीख

Munna Yadav Nagpur: नागपूरात पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्यासह मुलांवर गुन्हा

CM Eknath Shinde : बहिणीच देतील विरोधकांना उत्तर; योजना सुरूच राहणार

अग्रलेख : निमित्तापुरता यजमान!

Mumbai: मुंबईतील उड्डाणपुलाचे दोन वेळा होणार उद्घाटन,पालिका प्रशासनाची गोची

SCROLL FOR NEXT