मुंबई

Thane Metro: मेट्रो 12 च्या कास्टिंग यार्डला शेतकऱ्यांचा विरोध,वाचा काय आहे स्थानिकांच म्हणणं

शर्मिला वाळुंज

Farmers Against Metro: मेट्रो 12 प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या कास्टिंग यार्ड, लेबर कॅम्प साठी माणगाव मधील जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. एमएमआरडीएला पाच वर्षांच्या कालावधीसाठी नाममात्र भाडेतत्त्वावर जमीन देण्यात आली आहे.

या जमीन हस्तांतरणाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. सदर जमिनीवर शेतकऱ्यांच्या फळबागा, मत्स्यशेती तसेच राहती घर असल्याने शेतकऱ्यांनी त्यास विरोध केला होता.

मात्र पोलीस बळाचा वापर करून प्रशासनाने घरांवर बुलडोझर लावून बांधकाम जमीनदोस्त केली आहेत. येथे आमच्या जमिनी असून आम्हाला शासकीय नोटीस येणे आवश्यक असताना त्या आलेल्या नाहीत. त्यामुळे ही मोजणी थांबविण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदन देत केली आहे.

कल्याण तळोजा मेट्रोची ठाणे जिल्ह्यातील नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. या मेट्रोच्या कामाला लोकसभा निवडणुकीआधी सुरुवात झाली आहे. या मेट्रोसाठी सोनारपाडा, उंबार्ली रोड, माणगाव परिसरातील जागा रेल्वेच्या कामासाठी राज्य सरकारने एमएमआरडीएला पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर वर्ग केली आहे. परंतु शेतकऱ्यांनी जागेच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध केला आहे.

शुक्रवारी या जमिनीचा सर्व्ह होणार असल्याने शेतकरी आक्रमक झाले होते. मात्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने शेतकऱ्यांच या परिसरात काहीच चाललं नसल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सदरची जमीन आपल्या नावावर होण्यासाठी कल्याण तहसीलदार यांना पत्र देखील दिल आहे. तसेच पंधरा दिवसात सदरची जागा शेतकऱ्यांच्या नावावर न झाल्यास तहसीलदार कार्यालय समोर उपोषणास बसण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

सदरची जमीन ही शेतकऱ्यांच्या ताब्यात असून ग्रामपंचायत कालखंडात विस्तारित गावठाण क्षेत्रात ग्रामसभेच्या परवानगीने सदरचे बांधकाम करण्यात आल असल्याच शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सदरच्या प्रशासनाच्या कारवाईला शेतकऱ्यांनी शुक्रवारी विरोध केला असल्याचे दिसून आला आहे. शेतकऱ्यांनी संबंधित जागा ही आपल्याच मालकीची असून ती आपल्या नावावर व्हावी यासाठी कल्याण तहसीलदार यांना लेखी निवेदन दिल आहे.

कल्याण तळोजा मेट्रोच्या कामाला सुरवात झाली आहे. कल्याण ग्रामीण मधील सोनारपाडा, उंबार्ली रोड, माणगाव परिसरातील जागा ही मेट्रो रेल्वेच्या कामाकरीता राज्य सरकारने एमएमआरडीएला वर्ग केली आहे. त्याठिकाणी जागा सर्वेक्षणाकरीता एमएमआरडीएचे सर्व्हेअर गेले असता शेतकऱ्यांनी जागेच्या सर्वेक्षणास तीव्र विरोध केला. पण सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरु ठेवले आहे. याविषयी संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदारांना एक निवेदन दिले आहे.

माणगाव, उंबार्ली, माणगाव परिसरात जागा राज्य सरकारने महसूल खात्यामार्फत कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या प्रकल्पाकरीता भाडेतत्त्वावर वर्ग केली आहे. प्रकल्पासाठी वर्ग करण्यात आलेली जागा ही गायरान आहे. या गायरान जागेवर अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामे आहेत. ही बांधकामे हटविण्याची नोटीस या पूर्वीच तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे. गायरान जमीनीवरील बेकायदा बांधकाम आणि अतिक्रमणे नियमित करु नये असे आदेश उच्च न्यायालयाने 2022 साली दिले आहेत.

या ठिकाणी शेतकरी दशरथ म्हात्रे यांनी सांगितले की, आमची शेतजमीन वडिलोपार्जित आहे. ही जागा प्रकल्पांच्या बाधित गायरान जमीनीच्या मध्ये आहे. त्याठिकाणी एमएमारडीएकडून जबरदस्तीने सर्वेक्षण केले जात आहे. आमच्या शेतजागेचा मोबदला आम्हाला द्यावा. मगच सर्वेक्षणाचे काम करावे. या बाधित शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांचे नेते राजाराम पाटील यांनी देखील या सर्वेक्षणास विरोध केला आहे. या ठिकाणी असलेल्या पाच बेकायदा बांधकामांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

आम्ही अनेक वर्षा पासून या ठिकाणी शेती करत असून रेल्वेच्या या कामाला आमचा विरोध असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देत कामाला विरोध असल्याच्या हरकती नोंदवली असून आमच्या हरकतीवर सुनावणी केल्यानंतर कामाला सुरुवात करावी अशी मागणी यावेळी केली. मात्र सर्वेक्षण करणाऱ्या अधिकाऱ्यांनी निवेदन घेतल्यानंतर पोलीस बंदोबस्त घेत सर्वेक्षनाचे काम सुरु केल असून आता सोनारपाडा परिसरातील शेतकरी संतप्त झाले असून उग्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojna: लाडकी बहिण योजना सरकारनं तुर्तास थांबवली! काय आहे कारण? जाणून घ्या

Latest Maharashtra News Updates : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

JioCinema: जिओ सिनेमा लवकरच बंद होणार! मुकेश अंबानी घेऊ शकतात मोठा निर्णय; काय आहे कारण?

Local Train Derailed : मुंबईत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन घसरला; प्रवाशांचा खोळंबा

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT