farmers strike sakal media
मुंबई

‘नैना’प्रकल्प रद्द करा अन्यथा आत्‍मदहन करू, शेतकऱ्यांचा इशारा

पनवेलमध्ये लाक्षणिक उपोषण; प्रकल्‍प रद्द करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : नैना प्रकल्‍पांमुळे (NAINA Project) अनेक शेतकऱ्यांच्या पिकत्‍या जमिनी बाधित होत आहेत. आठ वर्षांपासून सिडकोकडून (cidco) केवळ आश्‍वासने देण्यात येत असल्‍याने प्रकल्‍प रद्द करण्यात यावा, अशी मागणी प्रकल्‍पग्रस्‍तांकडून (project cancellation demand) करण्यात आली आहे. मंगळवारी नैना प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण (Farmers strike) केले. नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेल्‍या उपोषणाची दखल न घेतल्‍यास मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढणार असल्याचे इशारा (Strike warning) या वेळी देण्यात आला. (cancel NAINA project otherwise farmers will do self immolation warning to cidco)

२०१३ मध्ये नैना (सिडको) प्रकल्प जाहीर झाला आहे. परंतु या प्रकल्पाच्या माध्यमातून कुठेही विकासकामे झालेली नाहीत. व्यावसायिकांना सुद्धा प्रकल्पाने वेठीस धरले आहे. प्रकल्‍पांतर्गत शेतकऱ्यांची ६० टक्के जमीन विनामोबदला घेण्यात येणार असून ४० टक्के जमीन शेतकऱ्यांकडे राहणार आहे. त्यासाठी लाखो रुपये प्रतिगुंठा शेतकऱ्यांकडून बेटरमेंट चार्जेस वसूल करणार आहे. दिशाभूल करणाऱ्या या प्रकल्‍पाला शेतकरी उध्वस्त होण्याची शक्‍यता आहे.

सुरुवातीला मूळ गावठाणापासून ४०० मीटर जागा गावाच्या विस्तारासाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु आता गावठाणात आरक्षण टाकले आहे. तसेच स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी वडिलोपार्जित जागेत बांधलेली शेतघरे, गोठे, चाळी अनधिकृत ठरवून लाखो रुपये वसूल करण्यासाठी वारंवार शेतकऱ्यांना व व्यावसायिकांना नोटिसा पाठवून त्यांचाकडून संमतीपत्र मागितले जात आहेत.

याविरोधात शेतकऱ्यांकडून संताप व्यक्‍त होत असून तीव्र आंदोलनाचा इशारा मंगळवारी देण्यात आला. आमदार बाळाराम पाटील, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नामदेव फडके, सुरेश ठाकूर, वामन शेळके, सुभाष भोपी, सुरेश पवार, राजेश केणी, अनिल ढवळे, नरेंद्र भोपी, नारायण पाटील आदी यावेळी उपस्‍थित होते.

आत्‍मदहनाचा इशारा

आठ वर्षे वारंवार कायदेशीर पत्रव्यवहार करूनही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रकल्प लादण्यात येत आहे. नैना प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल न घेतल्‍यास आत्मदहन करू असा इशारा शेतकरी उत्‍कर्ष समितीकडून देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: चंदगड मतदारसंघात शिवाजी पाटीलआघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT