Land in Nekni Pada Kalyan esakal
मुंबई

भूमीपुत्रांच्या 'इतक्या' एकर जागेवर बांधकाम व्यावसायिकांचे अतिक्रमण; आक्रमक शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

शर्मिला वाळुंज

पाटील यांच्या या जागेवर वडिलोपार्जित कब्जे वहिवाट आहे. या जागेत रविवारी सायंकाळी सात वाजता बिल्डरने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.

डोंबिवली : कल्याण (Kalyan) शीळ मार्गालगत असलेल्या नेकणी पाडा (Nekni Pada) येथील भूमीपुत्रांच्या पाच एकर जागेवर बांधकाम व्यावसायिक घुसखोरी करत असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी (Farmers) केला आहे. सदर जागा शेतकरी वासूदेव पाटील यांची असून त्यावर व्यावसायिक अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी अतिक्रमण थांबविले नाही तर त्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा भूमीपूत्रांनी दिला आहे.

कल्याण ग्रामीणमधील आजदे येथे राहणारे वासूदेव पाटील यांची नेकणी पाडा बस स्टॉपचा मागच्या बाजूला पाच एकर जागा आहे. पाटील यांच्या या जागेवर वडिलोपार्जित कब्जे वहिवाट आहे. या जागेत रविवारी सायंकाळी सात वाजता बिल्डरने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या साेबत खासगी बाऊन्सर आणले होते. या वेळी त्याठिकाणी पोलिसही पोहचले होते. या प्रकरणी खाजगी बिल्डरच्या घुसखोरीला पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

land in Nekni Pada Kalyan

पाटील यांनी सांगितले की, ही जागा आमच्या कब्जे वहिवाटीत आहेत. अशा प्रकारे परप्रांतीय बिल्डर आमच्या जागेत कशी काय घुसखोरी करु शकतो. त्याने आमच्या जागेत घुसखोरी करुन आम्हाला हुसकाविण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे. मात्र त्यांच्याकडून अशा प्रकारचा प्रयत्न पुन्हा केला जाऊ शकतो.

या भागातील भूमिपूत्र आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी सांगितले की, वासूदेव पाटील यांच्या जागेत बिल्डरने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटात वाद होऊ नये म्हणून पोलिस आले होते. वासूदेव पाटील आणि बिल्डर या दोघांच्या बाजू एकूण घेतल्या पाहिजेत. जागेचा प्रश्न हा महसूल विभागाशी संबंधित असल्याने पोलिसांनी वासूदेव पाटील आणि बिल्डरला महसूली अथवा दिवाणी न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला पाहिजे.

land in Nekni Pada Kalyan

बिल्डरने दडपशाही करण्याचा प्रयत्न केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला पोलिस जबाबदार असतील. हा प्रश्न सूटला नाही तर भूमीपूत्र आंदोलन करतील. वासूदेव यांच्या पत्नी वंदना पाटील यांनी सांगितले की, परप्रांतीय बिल्डरची आमच्या जागेत केली जाणारी घुसखोरी आम्ही खपवून घेणार नाही. त्या विरोधात आंदोलन करणार. भूमीपूत्रांनी घुसखोरी करणाऱ्या बिल्डरच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांशी (Manpada Police) संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT